नवी दिल्ली, 28 डिसेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आपल्या निराशाजनक कामगिरीमुळे सर्वांच्या टिकेचा धनी झाला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंतकडे पाहिले जात असताना, त्याची कामगिरी मात्र निराशाजनक राहिली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने चेन्नई वन डे मालिकेत अर्धशतकी खेळी केली मात्र त्यानंतर त्याने कोणत्याही सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. एवढेच नाही तर संघ अडचणीत असताना तो बेजबाबदार शॉट खेळत बाद झाला. यष्टीरक्षक म्हणूनही त्यानं निराशाजनक कामगिरी केली आहे. मात्र तरी, पंतला श्रीलंका दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. त्यामुळं एकीकडे त्याच्यावर टीका होत असताना, संघ व्यवस्थापन मात्र त्याला पाठीशी घालत आहे. वाचा- धोनीच्या नेतृत्वाखाली CSKकडून खेळणाऱ्या गोलंदाजानं जाहीर केली निवृत्ती ‘आपले मन शांत असेल तर कामगिरी चांगली होईल’ आता टीम इंडियाचे मुख्य निवडक, एमएसके प्रसाद यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, ‘जर तुम्ही चांगली विकेटकीपिंग केली नाही तर त्याचा फलंदाजीवर परिणाम होतो. आणि जर आपण धावा करण्यास अक्षम असाल तर याचा आपल्या विकेटकिपिंगवर परिणाम होतो. जेव्हा जेव्हा आपण दबाव असतो तेव्हा शरीर साथ देत नाही. अशा परिस्थितीत मैदानावर चांगली कामगिरी करणे नेहमीच कठीण असते’, असे सांगितले. वाचा- पाकिस्तानने 67 वर्षांत फक्त दोनच हिंदूना क्रिकेट संघात दिली जागा! ‘पंत काळाबरोबर शिकेल’ एमएसके प्रसाद यांनी यावेळी, “ऋषभ पंत हा एक तरुण खेळाडू आहे आणि तो अजूनही शिकत आहे. तो जोरदार कमबॅक करेल. त्याच्याकडे बराच वेळ आहे. तो अगदी लहान वयातच भारतीय संघात आला, त्यामुळे जास्त घरगुती क्रिकेट खेळू शकला नाही. हे त्याच्या खराब कामगिरीचेही एक कारण असू शकते. तो सामर्थ्यवान होईल यात मला शंका नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी शतक झळकावण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी क्षमता असेल तर त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे. पंत आता खेळपट्टीवर लांबलचक डाव खेळण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे, जाताना मोठे शॉट्स खेळण्यावर नाही. तो काळानुसार शिकेल”, असे सांगितले. वाचा- VIDEO : 130 किमी वेगानं आला चेंडू, फलंदाज जमिनीवर आणि स्टम्प हवेत!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







