स्पोर्ट्स

  • associate partner

IPL रद्द झाल्यास विराटसह 'या' 5 खेळाडूंना बसणार कोट्यवधींचा फटका

IPL रद्द झाल्यास विराटसह 'या' 5 खेळाडूंना बसणार कोट्यवधींचा फटका

आयपीएल रद्द झाल्यास एका फटक्यात विराटला होणार इतक्या कोटींचे नुकसान.

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : कोरोनाचा फटका इतर खेळांबरोबरच क्रिकेटलाही बसला आहे. त्यामुळे भारतातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगवर म्हणजेच आयपीएलवर टांगती तलवार आहे. सध्या कोरोनामुळे आयपीएलचे तेरावे हंगाम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळं 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. असे असले तरी, कोरोना प्रादर्भावर वाढल्यास आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द केला जाऊ शकतो.

कोरोनामुळे आयपीएल रद्द झाल्यास फक्त चाहत्यांचा नाही तर खेळाडूंचाही हिरमोड होणार आहे. त्याचबरोबर संघ आणि खेळाडूंना कोट्यावधींचे नुकसानही सहन करावे लागू शकते. आयपीएलच्या या हंगामासाठी डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जास्त मागणी होती. या लिलावात जलद गोलंदाज पॅट कमिन्सला 15.5 कोटींना, ग्लेन मॅक्सवेलला 10.75 तर नॅथन कुल्टर नाईलला 8 कोटींना विकत घेतले होते. त्यामुळं या खेळाडूंना तर याचा फटका बसणार आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनाही आयपीएलमुळे नुकसान होऊ शकते.

वाचा-IPL मध्ये आता आणखी एक ट्वीस्ट, एप्रिलमध्ये नाही तर...

विराट सगळ्यात महागडा खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू आहे. विराटला एका सामन्यासाठी 17 कोटी मिळतात. मात्र आयपीएल रद्द झाल्यास विराटचे मोठे नुकसान होऊ शकते. तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 15 कोटी आणि रोहित शर्माला 14 कोटी मिळतात. त्यामुळं या तीन खेळाडूंनाही नुकसान होऊ शकते.

वाचा-IPL लिलावात लागली कोट्यवधींची बोली, आता एका फटक्यात 'हे' खेळाडू होणार कंगाल

बीसीसीआयला होणार 10 हजार कोटींचे नुकसान

आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला सगळ्यात मोठा दणका बसणार आहे. जर या आकडेवारीवर विश्वास ठेवल्यास आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला 10 हजार कोटी रुपयांचा मोठा तोटा होऊ शकेल. क्रिकट्रॅकरने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआयचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. ही रक्कम दहा हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. इतकेच नव्हे तर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे प्रायोजकत्व, माध्यम हक्क, फ्रेंचायझी महसूल यांनाही कोट्यावधींचा तोटा होऊ शकतो.

First published: March 22, 2020, 7:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading