वेलिंग्टन, 22 फेब्रुवारी : न्यूझीलंड आणि भारत यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिल्या कसोटीला सुरुवात झाली असून दुसऱ्या दिवशी भारताचा संघ 165 धावांत गुंडाळला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने दिवसअखेर 216 धावा करत 51 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत असताना अचानक स्टेडियममध्ये विंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलवर कॅमेरा गेला. भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्यावेळी गेलला स्टेडियममध्ये पाहिल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
ख्रिस गेल न्यूझीलंडमध्ये काय करत आहे असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला. गेलने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, प्रमोशनल इव्हेंटसाठी मी इथं आलो होतो. नेपाळमध्ये एव्हरेस्ट प्रीमियर लीग होणार आहे. 29 फेब्रुवारीला ही लीग सुरू होणार असून त्यानंतर आयपीएलच्या तयारीला लागणार आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ वाया गेला. पहिल्या दिवशी 122 धावांवर संपलेल्या खेळानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने केवळ 43 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या न्यूझीलंडनं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 216 धावांपर्यंत मजल मारत 51 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून इशांत शर्मानं 3 विकेट घेत डाव सावरला.
The Universe Boss Christopher Henry Gayle having gud times at Basin Reserve , Wellington#INDvsNZ #NZvIND pic.twitter.com/99PoV2yW82
— a r r y (@aforarryan) February 22, 2020
न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सननं महत्त्वपूर्ण 89 धावांची खेळी. केन आणि रॉस टेलर (44) यांच्यात चांगली भागीदारी झाली. त्यामुळं न्यूझीलंडला आघाडी घेण्याची संधी मिळाली. पहिला दिवसाचा खेळ पावसामुळं संपल्यानंतर भारताला कमबॅक करता आला नाही. इशांत शर्मानं टॉम लेथम आणि टॉम ब्लंडेल या सलामीवीरांना माघारी धाडले. त्यानंतर शर्मानं केन आणि टेलर यांची भागीदारी मोडत टेलरला बाद केले.
VIDEO : चौकार मारला तरी दिली नाही एकही धाव, स्मिथने हुज्जत घालताच प्रेक्षक भडकले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chris gayle, Cricket