जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आता आपलीच हवा! आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया नंबर 1

आता आपलीच हवा! आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया नंबर 1

आता आपलीच हवा! आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया नंबर 1

आता आपलीच हवा! आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया नंबर 1

भारतीय संघाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे भारत आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमध्ये नंबर 1 वर पोहोचला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 जानेवारी : भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 2023 या नवीन वर्षात संघ एकामागोमाग असे आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमधील सर्व सामने जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील पहिला सामना देखील जिंकला. भारतीय संघाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे भारत आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमध्ये नंबर 1 वर पोहोचला आहे. आयसीसीने नुकत्याच सुधारित केलेल्या टीम रँकिंग नुसार टी 20 फॉरमॅटमध्ये भारत 18,445 पॉइंट आणि 267  रेटिंग सह पहिल्या स्थानावर आहे. तर वन डे रँकिंगमध्ये देखील 5,010 पॉइंट आणि 114 रेटिंग सह पहिल्या स्थानी आहे. तसेच टेस्ट रँकिंगमध्येही भारताने वर्चस्व राखले असून यात भारत 3,690 पॉईंट सह 115 स्थानी आहे.

News18लोकमत
News18लोकमत

एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान गाठणारा भारत हा आशियातील पहिला संघ ठरला आहे. दर जगातील दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघानेही अशी कामगिरी केली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताने प्रथम श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका जिंकून त्यांना व्हाईट वॉश दिला.  त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध ही वनडे आणि टी-20 मालिकेत विजय मिळवला. तसेच आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामनादेखील एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. त्यामुळे भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत नंबर वन ठरला आहे. येणाऱ्या महिन्यांमध्येही भारत कशी कामगिरी करत हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात