मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Asian Cup TT: खेळासाठी मॉडेलिंग सोडलं... 'या' मुलीने आज भारताला जिंकून दिलं ऐतिहासिक मेडल; Video

Asian Cup TT: खेळासाठी मॉडेलिंग सोडलं... 'या' मुलीने आज भारताला जिंकून दिलं ऐतिहासिक मेडल; Video

मनिका बत्रा

मनिका बत्रा

Asian Cup TT: एशियन कप टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत मनिकानं कांस्य पदकासाठीच्या लढतीत जपानच्या हिना हयाताचा 4-3 अशा फरकानं पराभव केला. या विजयासह मनिका बत्रा ही एशियन कपमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला ठरली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बँकॉक, 19 नोव्हेंबर: बँकॉकमध्ये पार पडलेल्या एशियन कप टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या 24 वर्षांच्या मुलीनं इतिहास घडवलाय. चीन, तैपेई, जपान, मलेशियाच्या खेळाडूंचं वर्चस्व असणाऱ्या या खेळात भारताच्या मनिका बत्रानं ऐतिहासिक पदकाची कमाई केली आहे. एशियन कप टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत मनिकानं कांस्य पदकासाठीच्या लढतीत जपानच्या हिना हयाताचा 4-3 अशा फरकानं पराभव केला. या विजयासह मनिका बत्रा ही एशियन कपमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला ठरली आहे.

सेमी फायनलमध्ये पराभव, पण...

एशियन कप टेबल टेनिसमध्ये सेमी फायनलच्या लढतीत जपानच्याच जागतिक क्रमवारीत चौथ्या नंबरवर असलेल्या खेळाडूकडून हार स्वीकारावी लागली होती. पण कांस्य पदकासाठीच्या लढतीत मनिकानं त्या पराभवाचा वचपा काढला. या विजयानंतर तिनं प्रतिक्रिया देताना म्हटलंय... 'हा माझ्यासाठी खूप मोठा विजय आहे. मी खेळाचा पूर्ण आनंद लुटला आणि अव्वल खेळाडूंना चांगली टक्कर दिली. यापुढेही मी अशीच मेहनत करेन'

हेही वाचा - Ind vs NZ: भारत-न्यूझीलंड दुसऱ्या टी20 सामन्यातही पाऊस ठरणार व्हिलन? पाहा काय सांगतोय Weather Report

खेळासाठी नाकारल्या मॉडेलिंगच्या ऑफर

मनिका बत्रा दिसायला खूप सुंदर आहे. त्यामुळे वयाच्या 16 व्या वर्षीच तिला मॉडेलिंगच्या अनेक ऑफर्स आल्या होत्या. पण खेळासाठी तिनं या सगळ्या ऑफर्स नाकारल्या. वयाच्या 4थ्या वर्षीपासूनच मनिकानं टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली होती. आतापर्यंत देशासाठी तिनं अनेक पदकं मिळवली आहेत. पण एशियन कपमध्ये आज मिळवलेलं कांस्यपदक तिच्यासाठी खास ठरावं.

First published:

Tags: Sport, Sports