जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20WC: विजयानंतर बुटात बिअर ओतुन पिण्याची ऑस्ट्रेलियन खेळाडूंची Inside Story

T20WC: विजयानंतर बुटात बिअर ओतुन पिण्याची ऑस्ट्रेलियन खेळाडूंची Inside Story

t20 world cup shoey celebration

t20 world cup shoey celebration

टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बुटात बिअर ओतुन पित विजयाचा जल्लोष (t20 world cup shoey celebration) साजरा केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 16 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) पराभव करत पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर संघातील काही खेळाडूंनी बुटात बिअर ओतुन पित विजयाचा जल्लोष (t20 world cup shoey celebration) साजरा केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. खेळाडूंचा हा अजब प्रकार पाहता क्रिकेटवेड्यांमध्ये संभ्रमता निर्माण झाली. असे का केले? असे अनेक प्रश्न क्रिकट जगतात उपस्थित होऊ लागले. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर आयसीसीने आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये मैथ्यू वेड (Matthew Wade) आणि मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) श्यूजमध्ये बिअर ओतून पिताना दिसत आहेत.

विजयानंतर बुटात बिअर ओतुन पिण्याची ऑस्ट्रेलियन खेळाडूंची Inside Story

तर या विचित्र पद्धतीला शूई असं म्हटलं जात असून (Shoey) अनेक पाश्चिमात्य देशात अशाप्रकारे आनंद साजरा केला जातो. बुटातून पेय पिण्याची पद्धत ऑस्ट्रेलियातूनच सुरु झाली. ऑस्ट्रेलियाचा फॉर्मूला वन स्टार डॅनियल रिकियार्डो याने 2016 साली ‘जर्मन ग्रँड प्रिक्स’ मध्ये अशाप्रकारे विजयानंतर बुटातून पेय पित आनंद साजरा केला होता. नंतर ही प्रथा इतरही देशांमध्ये पसरली. ब्रिटिश रेसिंग ड्रायवर लुइस हेमिल्टननेही ‘एमीलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स’मध्ये विजयानंतर अशाप्रकारे आनंद साजरा केला होता. तर यामागे विजयासाठी आपण जी मेहनत घेतो ती फळाला आल्याचा संदेश खेळाडू देऊ इच्छित असल्याचे सांगण्यात येते. न्यूझीलंडने दिलेलं 173 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने फक्त दोन विकेट गमावून अगदी सहज पार केले. याआधी ऑस्ट्रेलियाने पाच वनडे वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या नावावर आता रेकॉर्ड 6 वर्ल्ड कप आहेत.

जाहिरात

यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिस शूजमध्ये बिअर पिताना दिसत आहेत. अवघ्या 20 मिनिटांत हा व्हिडिओ 30 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात