मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : टीम इंडिया पराभवाच्या धक्क्यात असतानाच शोएब अख्तरने डिवचलं, म्हणाला...

T20 World Cup : टीम इंडिया पराभवाच्या धक्क्यात असतानाच शोएब अख्तरने डिवचलं, म्हणाला...

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. भारताने दिलेलं 169 रनचं आव्हान इंग्लंडने 16 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पार केलं.

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. भारताने दिलेलं 169 रनचं आव्हान इंग्लंडने 16 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पार केलं.

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. भारताने दिलेलं 169 रनचं आव्हान इंग्लंडने 16 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पार केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. भारताने दिलेलं 169 रनचं आव्हान इंग्लंडने 16 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पार केलं. एलेक्स हेल्सने नाबाद 86 आणि जॉस बटलरने नाबाद 80 रन केले. टीम इंडियाविरुद्धच्या या विजयानंतर इंग्लंडने फायनलमध्ये मजल मारली आहे. आता रविवारी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. टीम इंडियाच्या या दारूण पराभवानंतर पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने भारताला डिवचलं आहे.

'भारत खूपच खराब खेळला, ते पराभवच डिझर्व्ह करत होते. ते फायनलमध्ये पोहोचण्याच्या लायक नव्हते. भारतीय बॉलिंग वाईट प्रकारे उघडी पडली, त्यांच्याकडे कोणीही एक्सप्रेस बॉलर नाही. वातावरण अनुकूल असेल तरच ते चांगली बॉलिंग करू शकतात. तुम्हाला मेलबर्नमध्ये भेटण्याची आमची इच्छा होती, पण आता असं होणार नाही. फायनलनंतर तुम्हाला भेटायचं असेल, तर आम्ही हजर असू, पण यावर फायनलनंतरच बोलू,' असं शोएब अख्तर म्हणाला आहे.

'भारताकडे प्रॉपर स्पिनर आहे, तरीही त्याला का खेळवण्यात आलं नाही, माहिती नाही. टीम निवड करण्यात कनफ्यूजन आहे. इंग्लंड बॅटिंगला आली तेव्हा लढाई होईल, असं मला वाटलं होतं, पण भारताने लवकर गुडघे टेकले. भारतीय बॉलर काहीतरी करतील, लढतील, बाऊन्सर टाकतील, आक्रमकता दाखवतील, असं वाटलं होतं, पण त्यांनी काहीच दाखवलं नाही. हार्दिक पांड्याला न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार बनवलं आहे, इमर्जिंग कॅप्टन आहे, तो कायमचा कॅप्टन होणार का?' असा सवाल शोएबने विचारला आहे.

याआधी भारताची बॉलिंग सुरू असताना शोएब अख्तरने ट्वीट करून टीम इंडियाला डिवचलं होतं. भावांनो एकही विकेट घ्यायची नाही का? असं ट्वीट शोएबने केलं होतं. तसंच इंग्लंड पहिल्या बॉलपासून उत्कृष्ट खेळली, 10 ओव्हरमध्ये 100 रन जबरदस्त आहे, असंही शोएब म्हणाला.

First published:

Tags: Shoaib akhtar, T20 world cup, T20 world cup 2022, Team india