मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /AUS vs PAK सेमीफायनलमध्ये वॉर्नरने 6 रन चोरल्या, गौतमचा 'गंभीर' आरोप

AUS vs PAK सेमीफायनलमध्ये वॉर्नरने 6 रन चोरल्या, गौतमचा 'गंभीर' आरोप

Gautam Gambhir

Gautam Gambhir

क्रिकेट जगतातून ऑस्ट्रेलियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir ) ऑस्ट्रेलियच्या डेव्हिड वॉर्नरवर संताप व्यक्त केला आहे.

दुबई, 12 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final) सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला (Australia vs Pakistan) पराभवाचा धक्का दिला. या विजयामुळे क्रिकेट जगतातून ऑस्ट्रेलियावर कौतुकाचा वर्षाव होत असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir ) ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने सामन्यामध्ये 6 रन चोरल्या असा गंभीर आरोप केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या डावात 8 व्या षटकात फिरकीपटू मोहम्मद हाफिज गोलंदाजी करत होता. या षटकातला पहिलाच बॉल हाफिजने असा काही टाका की तो दोन टप्पा पडत वॉर्नरपर्यंत पोहचला. वॉर्नरनेही या बॉलवर अगदी लेग स्टम्पच्या बाहेर, क्रिझच्या बाहेर जात उंच षटकार लगावला. हा चेंडू दोन टप्पा आल्याने पंचांनी तो नो बॉल ठरवला आणि वॉर्नरला एका चेंडूमध्ये सात धावा मिळाल्या.

नियामनुसार हा बॉल नो बॉल होता. यावर गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वॉर्नरने लगावलेला षटकार हा खेळ भावनेच्या विरोधात असल्याचं गंभीरने ट्विटरवरुन म्हटलं आहे. इतकच नाही तर गंभीरने भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्वीनला या ट्विटमध्ये टॅग करत यासंदर्भात त्याचं मत काय आहे असंही विचारले आहे.

तसेच स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीरने वॉर्नरने रन मिळवल्या नाही तर चोरल्या आहेत. असा गंभीर आरोप करत डेव्हिडवर संताप व्यक्त केला आहे. तो म्हणाला की इतर संघांना धडा शिकवणे सोपे आहे, परंतु ते स्वतःला लागू करणे कठीण आहे.

हरभजन म्हणाला- तो नेहमी असे करतो

भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगनेही यावर आपले मत व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने असे पहिल्यांदा केलेले नाही. ते नेहमी असेच करतात. रिकी पाँटिंग आणि मायकेल क्लार्क यांचा उल्लेख करताना तो म्हणाला की, दोघेही नेहमीच वादग्रस्त असतात. मैदानावर तो नेहमीच चुकीच्या कारणांमुळे चर्चेत राहिला. हरभजनने डेव्हिड वॉर्नरबद्दल सांगितले की, त्याला या चेंडूवर षटकार मारण्याची गरज नाही. या सामन्यात वॉर्नरने 49 धावा केल्याची माहिती आहे. पण तो चुकीच्या पद्धतीने अंपायरने झेलबाद झाला. रिव्ह्यू मिळाल्यानंतरही वॉर्नरला त्याचा उपयोग करता आला नाही.

ऑस्ट्रेलियानं गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये (Australia vs Pakistan Semi Final) पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सुपर 12 मध्ये सर्व मॅच जिंकणाऱ्या पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवता आला नाही. या पराभवाबरोबरच पाकिस्तानचं विजेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. आता रविवारी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची लढत न्यूझीलंडशी (Australia vs New Zealand T20 World Cup 2021 Final) होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Australia, David warner, Gautam gambhir, T20 cricket, T20 league, T20 world cup