मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : मार्टिन गप्टील पुन्हा झाला टीम इंडियाचा 'व्हिलन', दुसऱ्यांदा मोडणार भारताचं स्वप्न!

T20 World Cup : मार्टिन गप्टील पुन्हा झाला टीम इंडियाचा 'व्हिलन', दुसऱ्यांदा मोडणार भारताचं स्वप्न!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी खराब झाली आहे. टीम इंडियाला आता अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे. याचसोबत न्यूझीलंडने स्कॉटलंडविरुद्धचा सामना गमावण्याची गरज आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 3 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी खराब झाली आहे. पहिले पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना 8 विकेटने गमावला. यामुळे टीम इंडियाच्या सेमी फायनलच्या प्रवेशाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाला आता अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे. याचसोबत न्यूझीलंडने स्कॉटलंडविरुद्धचा सामना गमावण्याची गरज आहे. स्कॉटलंडची किवी टीमविरुद्धची सुरुवातीची कामगिरी बघून भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, पण मार्टिन गप्टीलने (Martin Guptill) मोठा धक्का दिला.

न्यूझीलंडची अवस्था 6.1 ओव्हरमध्ये 52/3 अशी झाली होती. डॅरेल मिचेल 13 रनवर, केन विलियमसन शून्य आणि डेवॉन कॉनवे एक रन करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते, पण मार्टिन गप्टीलने ग्लेन फिलिप्सच्या मदतीने स्कॉटलंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. 56 बॉलमध्ये 93 रन करून गप्टील आऊट झाला. त्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. ग्लेन फिलिप्सने 37 बॉलमध्ये 33 रन केले. गप्टील आणि फिलिप्स यांच्यात चौथ्या विकेटसाठी 105 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 172 रनपर्यंत मजल मारली असती. स्कॉटलंडला गप्टीलची विकेट लवकर मिळाली असती तर मॅचचं चित्र वेगळं असतं, आणि याचा फायदा भारतालाही झाला असता.

आधीही केला गप्टीलने घात

याआधी 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्येही (2019 ODI World Cup) मार्टिन गप्टीलने टीम इंडियाचा घात केला होता. सेमी फायनलमध्ये मार्टिन गप्टीलने केलेल्या डायरेक्ट थ्रोमुळे एमएस धोनी (MS Dhoni) रन आऊट झाला होता. 50 रनची खेळी करून धोनी पॅव्हेलियनमध्ये परतला आणि भारताचं फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा 18 रनने पराभव झाला. गप्टीलने केलेला थ्रो स्टम्पवर लागला नसता, तर कदाचित धोनीने तो सामना भारताला जिंकवून दिला असता.

लागोपाठ तीन स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने दिला धक्का

न्यूझीलंडच्या टीमने भारताला लागोपाठ तीन आयसीसी स्पर्धांमध्ये धक्का दिला आहे. वनडे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलनंतर न्यूझीलंडने जून महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये टीम इंडियाचा पराभव केला होता, यानंतर टी-20 वर्ल्ड कपमध्येही न्यूझीलंडने भारताला धूळ चारली. आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाचं न्यूझीलंडविरुद्धचं रेकॉर्डही खराब आहे. भारताला 2003 वनडे वर्ल्ड कपमध्ये किवी टीमविरुद्ध विजय मिळवता आला आहे. टी-20 वर्ल्ड कप इतिहासातल्या तिन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे.

First published:

Tags: New zealand, T20 world cup, Team india