मुंबई, 18 मार्च : 2024 मध्ये होणाऱ्या आयसीसीच्या टी 20 वर्ल्ड कप विषयी मोठी माहिती समोर येत आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 चे यजमानपद आयसीसीने वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांमध्ये विभागून दिले होते, परंतु आता यामधून आयसीसीने अमेरिकेला वगळून मोठा दणका दिला आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 चे यजमानपद आयसीसीने अमेरिकेकडून काढून घेतल्याची माहिती समोर येत आहे.
ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मागील वर्षी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या आयोजनाबाबत अधिकृत घोषणा केली होती. यानुसार 2024 चा टी 20 वर्ल्ड कप हा अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये होणार होता. परंतु सध्या हाती येत असलेल्या मीडिया रिपोर्टनुसार आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चे सह-यजमानपद अमेरिकेकडून काढून घेण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आयसीसीने अमेरिकेचे सह यजमान पदाचे अधिकार आता काढून घेतले आहेत. युनायटेड स्टेट्स क्रिकेट संस्थेकडून स्पष्टतेचा अभाव हे सह-यजमानपद काढून घेण्याचे मुख्य कारण असल्याचे म्हंटले जात आहे. यासह 2024 मध्ये प्रथमच आयसीसीच्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरलेला अमेरिकन क्रिकेट संघ देखील स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. परंतु अद्याप याबाबत आयसीसीने निवेदन जाहीर करून अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Cricket, Cricket news, Icc, West indies