मुंबई, 2 डिसेंबर: यूएईमध्ये सुरू असलेल्या टी10 क्रिकेटमध्ये (T10 Cricket League) प्रत्येक मॅचमध्ये बॅटर नवे रेकॉर्ड करत आहेत. क्रिकेटमधील या सर्वात छोट्या प्रकारात वेगवान खेळाचं उदाहरण रोज पाहयला मिळत आहे. बुधवारी दिल्ली बुल्स विरुद्ध चेन्नई ब्रेव्हस (Delhi Bulls vs Chennai Braves) ही मॅच झाली. या मॅचमध्ये दिल्लीच्या 20 वर्षांच्या खेळाडूनं वादळी बॅटींग केली त्यानं 6 सिक्स लगावत फक्त 20 मिनिटांमध्ये टीमला विजय मिळवून दिला. रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) असं या आक्रमक खेळाडूंचं नाव आहे. तो अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. चेन्नईनं पहिल्यांदा बॅटींग करत दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त 20 मिनिटे लागली. या कालावधीत त्यानं T10 क्रिकेटच्या या सिझनमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड देखील केला.
Rahmanullah Gurbaz hits the fastest 5️⃣0️⃣ of #Season5, just 14 balls 🤯#AbuDhabiT10 #InAbuDhabi #CricketsFastestFormat pic.twitter.com/Aa32h2bl5v
— T10 Global (@T10League) December 1, 2021
चेन्नई ब्रेव्हसं पहिल्यांदा बॅटींग करत 10 ओव्हर्समध्ये 4 आऊट 80 रन केले. दिल्ली बुल्सनं हे टार्गेट फक्त 25 बॉलमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केले. गुरबाजनं 356.25 च्या स्ट्राईक रेटनं 16 बॉलमध्ये 57 रनची नाबाद खेळी केली. त्याने यावेळी 6 सिक्स आणि 5 फोर लगावले. गुरबाजनं फक्त 14 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. हे या सिझनमधील सर्वात जलद अर्धशतक आहे. विराटसाठी मुंबई टेस्टमध्ये ‘या’ खेळाडूला वगळणार, वाचा द्रविडच्या मनात चाललंय काय? गुरबाजला चंद्रपॉल हेमराजनं भक्कम साथ दिलीय त्यानं 9 बॉलमध्ये 266.66 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 24 रनची खेळी केली. हेमराजनं यामध्ये 1 सिक्स आणि 3 फोर लगावले. ही जोडी फोडण्यासाठी चेन्नईच्या कॅप्टननं 4 बॉलर्सचा वापर केला. पण, एकालाही त्यांनी दाद दिली नाही. 10 बॉलमध्ये 5 विकेट्स! टी10 लीगमधील अन्य एका मॅचमध्ये श्रीलंकेच्या लेग स्पिनर वानिंदु हसरंगाने (Wanindu Hasaranga) 10 बॉलमध्येच 5 विकेट घेतल्या आहेत. डेक्कन ग्लॅडिएटर्सकडून खेळणाऱ्या हसरंगाने बंगाल ग्लॅडिएटर्स विरुद्ध ही कामगिरी केली. एवढच नाही तर त्याने 2 ओव्हरमध्ये फक्त 8 रन दिले. पहिल्या दोन बॉलवर हसरंगाला विकेट मिळाली नव्हती. श्रीलंकेच्या या बॉलरने टी10 लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 10 सामन्यांमध्ये त्याने 18 विकेट घेतल्या आहेत. एवढच नाही तर त्याचा इकोनॉमी रेटही 9 पेक्षा कमी आहे. आयपीएल 2021 मध्ये हसरंगा आरसीबी कडून खेळला, पण त्याला टीमने रिटेन केलेले नाही.