Elec-widget

विराट, रोहितसह टीम इंडियाच्या खेळाडूंनाही लागणार ‘नाइट शिफ्ट’!

विराट, रोहितसह टीम इंडियाच्या खेळाडूंनाही लागणार ‘नाइट शिफ्ट’!

या खास कारणासाठी विराटसेनेला करावी लागणार नाइट शिफ्ट.

  • Share this:

इंदूर, 12 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिका टीम इंडियानं आपल्या खिशात घातली. आता या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून इंदूरच्या होळकर मैदानावर होणार आहे. तर, इडन गार्डन येथे होणारा दुसरा सामना डे-नाइट खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच दिवस-रात्र सामना खेळवला जाणार आहे. हा सामना लाल नाही तर गुलाबी चेंडूनं खेळवण्यात येणार आहे.

डे-नाइट कसोटी सामन्याच्या तयारीसाठी सध्या भारतीय संघ बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये राहुल द्रविडच्या देखरेखीखाली सराव सुरू होता. दरम्यान आता बुधवारी इंदूरमध्ये होणाऱ्या सामन्याचा सराव केला जाणार आहे. त्यामुळं डे-नाइट सामन्यासाठी आता विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसह टीम इंडियाच्या खेळाडूंना नाइट शिफ्ट करावी लागणार आहे.

दरम्यान, कोलकातामध्ये होणाऱ्या या सामन्याआधी भारतीय संघ मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशच्या मदतीनं रात्री लाईट लावून सामा करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळं आता भारतीय संघ सकाळी पहिल्या सामन्याचा तर रात्री ऐतिहासिक सामन्याचा सराव करणार आहे. याबाबत मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव मिलिंद कनमाडीकर यांनी, “भारतीय संघानं रात्री सराव करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यासाठी रात्री लाईट लावून सराव करण्यात येणार आहे. त्यासाठी आमच्या वतीनं सर्व तयारी करण्यात आली आहे”, असे सांगितले.

वाचा-ऐतिहासिक कसोटी सामन्याआधी भारताला मिळाला 'महागुरू', रहाणेनं सांगितला मास्टरप्लॅन

अजिंक्य रहाणेनं गुलाबी चेंडूसोबत पहिल्यांदा खेळण्याबाबत केला खुलासा

Loading...

भारताचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) बीसीसीआय टीव्हीशी बोलताना पिंक टेस्ट खेळण्याबाबत खुलासा केला. याबाबत बोलताना रहाणेनं, “मी स्वत: डे-नाइट सामन्यासाठी खुप उत्सुक आहे. मला माहित नाही काय होईल पण सराव केल्यानंतर आम्हाला एक अंदाज आला आहे. त्यामुळं आता आम्हाला कळले आहे की पिंक बॉल किती स्विंग होईल. मी पहिल्यांदाच पिंक बॉलसह खेळणार आहे. त्याचबरोबर लाल चेंडूसोबत खेळण्यापेक्षा गुलाबी चेंडूनं खेळणे जास्त कठिण आहे”, असेही सांगितले.

वाचा-स्मार्ट गोलंदाजानं अम्पायरला दिला चकवा! हा VIDEO एकदा पाहाच

चेतेश्वर पुजाराचा पिंक बॉलचा अनुभव संघासाठी फायद्याचा

भारताच तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज चेतेश्वर पुजारानं दुलीप ट्रॉफीमध्ये गुलाबी चेंडूनं खेळण्याचा अनुभव असल्याचे सांगितले. यावेळी पुजारानं, “मी 2016-17मध्ये पहिल्यांदा गुलाबी चेंडूनं खेळलो होतो. त्यानंतर खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्याचा नक्की फायदा होईल”, असे सांगितले.

असा असेल डे-नाईट सामना

नोव्हेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या गुलाबी पर्वाची सुरुवात इडन गार्डन्स मैदानावरून होणार आहे. आगामी भारतीय दौऱ्यावर बांगलादेशचा संघ (Bangladesh Cricket Team) इडन गार्डन्स (Eden Gardens)मैदानावर डे/नाईट कसोटी सामना खेळणार आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(BCCI)ने दिलेल्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डा(Bangldesh Cricket Board)ने हिरवा कंदील दाखवला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये डे/नाईट कसोटीला आधीच सुरुवात झाली आहे. पण भारतात हा पहिलाच अशा प्रकारचा सामना होत आहे.

वाचा-असा गोलंदाज होणे नाही! 72 तासांत भारतीय गोलंदाजानं घेतली दुसरी हॅट्रिक

डे-नाईट सामन्याचे नियम

पारंपारिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जात असले तरी दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये वापरला जाणारा चेंडू मात्र गुलाबी रंगाचा असतो. रात्री प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत. इतर प्रथम श्रेणी क्रिकेट प्रमाणेच डे-नाईट टेस्टमध्ये 80 षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. डे- नाईट कसोटी सामन्यांमध्येसुध्दा दिवसाला सहा तास आणि 90 षटकांच्या खेळाचे नियोजन असते. यात फॉलोऑन नचा नियम डे- नाईट कसोटीसाठी मात्र वेगळा आहे. पारंपरिक कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर 200 धावांची आघाडी असली तर फॉलोऑन देता येता. दिवस -रात्र सामन्यात हीच आघाडी 150 धावांची असली तरी फॉलोऑन देता येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2019 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...