'केएल राहुलचं यष्टीरक्षण संघाला महागात पडणार, धोनीचं मौन समजण्यापलिकडे'

'केएल राहुलचं यष्टीरक्षण संघाला महागात पडणार, धोनीचं मौन समजण्यापलिकडे'

केएल राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्याच्या निर्णयावर भारताचा माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांनी घणाघाती नाराजी व्यक्त केली आहे.

  • Share this:

लखनौ, 26 जानेवारी : भारतीय संघात आघाडीच्या फळीतला फलंदाज केएल राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्याच्या निर्णयावर भारताचा माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांनी घणाघाती टीका केली आहे. हा निर्णय म्हणजे पायावर दगड मारून घेण्यासारखाच असल्याचं सय्यद किरमानी यांनी म्हटलं आहे. सध्या संघाची गरज म्हणून जरी योग्य वाटत असलं तरी पायावर दगड मारून घेतल्याचा प्रकार आहे. केएल राहुल संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे आणि तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

किरमानी यांनी म्हटलं की, यष्टीरक्षण एक विशेष काम आहे आणि यात थोडी जरी चूक झाली तरी महागात पडू शकतं. देव न करो पण जर केएल राहुलला दुखापत झाली तर ते महागात पडेल. ऋषभ पंतला दुखापत झाल्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध केएल राहुलने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण केलं होतं. त्यानं यष्टीरक्षणात आपली चुणूक दाखवली. त्यानंतर कोहलीनेही त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. यामुळे संघात एक अधिकचा गोलंदाज खेळवण्याची संधी निर्माण झाली आहे.

केएल राहुल संघात यष्टीरक्षक म्हणून राहिला तर भारताला आणखी एक गोलंदाज खेळवता येईल का? यावर सय्यद किरमानी म्हणाले की, संघात जर पाच फलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू मिळून संघाला विजय मिळवून देऊ शकत नसतील तर एक्स्ट्रा गोलंदाजाने फारसा फरक पडणार नाही. राहुलला दुखापत होण भारतीय संघासाठी धोक्याचं असेल.

विराटने केली अशी चूक की LIVE सामन्यातच लपवावं लागलं तोंड!

सध्या भारताचा माजी कर्णधार आणि धोनी क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्याऐवजी निवड समिती पंत, सॅमसन, साहा यांना तयार करत आहे. तर केएल राहुलचा पर्यायही समोर आला आहे अशा परिस्थितीत धोनीला भारतीय संघाचे दरवाजे बंद झालेत का असं विचारलं असता किरमानी म्हणाले की, धोनीचं मौन समजण्यापलिकडे आहे.

वर्ल्ड कप जिंकण्यापासून फक्त 3 पाऊलं दूर आहे टीम इंडिया!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2020 06:44 PM IST

ताज्या बातम्या