Home /News /sport /

IND vs NZ : विराटने केली अशी चूक की LIVE सामन्यातच लपवावं लागलं तोंड!

IND vs NZ : विराटने केली अशी चूक की LIVE सामन्यातच लपवावं लागलं तोंड!

भारत-न्यूझीलंड यांच्यात सध्या दुसरा टी-20 सामना सुरू असून, किवींनी 132 धावा केल्या.

  ऑकलंड, 26 जानेवारी भारत-न्यूझीलंड यांच्यात सध्या दुसरा टी-20 सामना सुरू असून, किवींनी 20 ओव्हरमध्ये 132 धावा केल्या. त्यामुळं भारताला हा सामना जिंकण्यासाठी 133 धावांची गरज आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली. भारताकडून रवींद्र जडेजानं 2, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. टॉस गमावनूही विराट कोहली गोलंदाजांच्या खेळीवर खुश होता. मात्र सामन्यात एक असा प्रकार घडला ज्यामुळं विराटला तोंड लपवावे लागले. न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मार्टिन गुप्टिल आणि कॉलिन मुनरो यांनी आक्रमक सुरुवात केली. अखेर विराट कोहलीनं उत्कृष्ठ झेल घेत शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर गुप्टिलला 33 धावांवर बाद केले. त्यामुळं या सलामीवीरांची जोडी 48 धावांची भागीदारी फोडली. यात विराटनं घेतलेला कॅच सर्वांच्या लक्षात राहिला. गुप्टिलला बाद केल्यानंतर विराटनं रागही व्यक्त केला. त्यानंतर लगेचच शिवम दुबेनं कॉलिनला 26 धावांवर विराटच्या हाती कॅच देत माघारी धाडले. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे किवींच्या फलंदाजांना कमबॅक करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर रवींद्र जडेजानं कॉलिन डी ग्रॅंडहोम आणि फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार केन विल्यमसनला 14 धावांवर बाद केले. मात्र जसप्रीत बुमराहच्या 19व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर रॉस टेलरचा एक सोपा कॅच विराटनं सोडला. विराटनं कॅच सोडला आहे, यावर संघातील खेळाडूंचा आणि बुमराहचाही विश्वास बसला नाही. त्यामुळं कॅच सोडल्यानंतर विराटला तोंड लपवावे लागले. मात्र पुढच्याच चेंडूवर बुमराहनं रोहितच्या हातात कॅच सोपवत रॉस टेलरला 18 धावांवर बाद केले. याआधी पहिल्या सामन्यात रॉस टेलरनेच आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडला 203 धावा करून दिल्या होत्या.
  दरम्यान, पहिला सामना भारतानं केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिला सामना जिंकला. त्यामुळं दुसऱ्या सामन्यातही फलंदाजांसमोर सोपे आव्हान आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Cricket, Virat kohli

  पुढील बातम्या