जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 मध्ये चमकदार कामगिरी, आता सूर्याच्या फ्रेण्डसाठी आणखी मोठी न्यूडन्यूज!

IPL 2023 मध्ये चमकदार कामगिरी, आता सूर्याच्या फ्रेण्डसाठी आणखी मोठी न्यूडन्यूज!

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव

के एल राहुलच्या जागी टीम इंडियातून तो खेळण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : आयपीएलमध्ये आपल्या बॅटिंगने मैदान दणाणून सोडणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सूर्यकुमारची कामगिरी आयपीएलमध्ये दमदार आहेच पण आता त्याला टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. के एल राहुलच्या जागी टीम इंडियातून तो खेळण्याची शक्यता आहे.

IPL 2023 : ‘दिल्लीतून पळून गेलेले भगोडे….’ विराट सोबतच्या राड्यानंतर गौतम गंभीरच वादग्रस्त ट्विट

लखनऊ टीमचा कर्णधार के एल राहुल सध्या दुखापतीमुळे मैदानापासून लांब आहे. त्याने आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र मैदानात कधी परतणार याबाबत अजून कोणतीही स्पष्टता नाही. दुसरीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम जाहीर झाली. यामध्ये के एल राहुलचं नाव देखील आहे. के एल राहुल दुखापतीमुळे खेळेल की नाही माहिती नाही. के एल राहुलच्या जागी तगडा आणि धुरंधर बॅट्समन टीम इंडियातून खेळवण्याबाबत विचार सुरू आहे. यामध्ये सूर्यकुमारचं नाव या लिसटमध्ये पहिल्या स्थानावर आहे. के एल राहुलच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. IPL 2023 MI vs PBKS : ‘हिरो टू झिरो’ वानखेडेवर स्टंप्स तोडणाऱ्या अर्शदीपचा लाजिरवाणा विक्रम जर केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी फिट झाला नाही, तर ‘मिस्टर 360 डिग्री’ बॅट्समन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवचा संघात समावेश केला जाऊ शकतो. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 31 बॉलमध्ये 66 धावा केल्या आहेत.या मोसमातील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले. अशा स्थितीत निवड समिती पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवच्या नावाचा विचार करू शकते.

News18लोकमत
News18लोकमत

टीम इंडियाने आयपीएलपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेत सूर्यकुमार यादवला सामना खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याला या संधीचं सोनं करता आलं नाही. आयपीएलमध्ये त्याने पुन्हा चांगली केल्याने त्याला वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपसाठी पुन्हा संधी दिली जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात