advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 MI vs PBKS : 'हिरो टू झिरो' वानखेडेवर स्टंप्स तोडणाऱ्या अर्शदीपचा लाजिरवाणा विक्रम

IPL 2023 MI vs PBKS : 'हिरो टू झिरो' वानखेडेवर स्टंप्स तोडणाऱ्या अर्शदीपचा लाजिरवाणा विक्रम

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात स्टंप तोड कामगिरी करणाऱ्या पंजाब किंग्सचा गोलंदाज अर्शदीप सिंहने आयपीएल 2023 मधील 46 व्या सामन्यात मुंबई विरुद्ध खराब गोलंदाजी करून लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे.

01
आयपीएल 2023 मधील 46 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पारपडला. या सामन्यात मुंबई पंजाबवर 6 विकेट्सने विजय मिळवला.

02
या सामन्यात मुंबईने वानखेडेवर पंजाब किंग्सकडून पत्करलेल्या पराभवाचा हिशोब चुकता करून पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यात पंजाबने दिलेले 215 धावांचे आव्हान पूर्ण केले.

03
आयपीएल 2023 मधील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या 31 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा गोलंदाज अर्शदीप सिंह याने जबरदस्त गोलंदाजी करून शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबला विजय मिळवून दिला होता.

04
वानखेडेवरील सामन्यात अर्शदीपने तिलक वर्मा आणि नेहाल वढेराची विकेट घेत असताना तब्बल दोनदा स्टंप्स तोडले होते. यामुळे अर्शदीप या सामन्याचा हिरो ठरला होता.

05
परंतु बुधवारी मोहाली येथे पुन्हा मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात, अर्शदीपने गोलंदाजीचे खराब प्रदर्शन करून 3 ओव्हरमध्ये केवळ 1 विकेट मिळवत तब्बल 66 धावा दिल्या.

06
अर्शदीपने एकदा नाही तर मागील सलग तीन सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा 50 हुन अधिक रन्स दिले आहेत. ही खेळी अर्शदीपच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात खराब खेळी ठरली आहे. तसेच आयपीएल 2023 च्या आतापर्यंत झालेल्या सामन्यात एका डावात सर्वाधिक रन्स देणारा अर्शदीप हा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • आयपीएल 2023 मधील 46 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पारपडला. या सामन्यात मुंबई पंजाबवर 6 विकेट्सने विजय मिळवला.

    MORE
    GALLERIES