मुंबई, 05 जानेवारी : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 30 शतके करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथला हा विश्वविक्रम मोडण्याची संधी होती. पण त्याची ही संधी थोडक्यात हुकली. मात्र कसोटीत सर्वात कमी डावात 30 शतके करण्याच्या बाबतीत स्मिथने मॅथ्यू हेडन, रिकी पाँटिंग आणि भारताचे लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांना मागे टाकलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 30 किंवा त्यापेक्षा जास्त शतक करणारे केवळ 14 फलंदाज आहेत. आता या यादीत स्टिव्ह स्मिथचासुद्धा समावेश झाला आहे.
स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 104 धावा केल्या आणि हे त्याच्यचा कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक ठरले. कसोटी कारकिर्दीत 30 शतके पूर्ण करण्यासाठी स्मिथला 162 डाव खेळावे लागले. तर सचिनने ही कामगिरी 159 डावात केली होती.
हेही वाचा : माझं रेकॉर्ड मोडता मोडता तो..., शोएब अख्तरची उमरान मलिकच्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया
स्मिथ आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यानतंर 167 डावांसह मॅथ्यू हेडन असून चौथ्या क्रमांकावर 170 डावात अशी कामगिरी करणारा रिकी पाँटिंग आहे. पाचव्या क्रमांकावर सुनिल गावस्कर असून त्यांनी 174 डावात कसोटी कारकिर्दीत ही किमया केली होती.
सिडनी कसोटीत दुसऱ्या दिवशीही पावसाने व्यत्यय आणला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 131 षटकात 4 बाद 475 धावा केल्या आहेत. मॅट रेनशॉ पाच आणि उस्मान ख्वाजा 195 धावावंर खेळत आहेत. स्मिथने 192 चेंडूत 11 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Sachin tendulkar, Steven smith