मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /माझं रेकॉर्ड मोडता मोडता तो..., शोएब अख्तरची उमरान मलिकच्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया

माझं रेकॉर्ड मोडता मोडता तो..., शोएब अख्तरची उमरान मलिकच्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया

जगात सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम शोएब अख्तरच्या नावावर असून त्यानेही उमरान मलिकच्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया दिली आहे.

जगात सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम शोएब अख्तरच्या नावावर असून त्यानेही उमरान मलिकच्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया दिली आहे.

जगात सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम शोएब अख्तरच्या नावावर असून त्यानेही उमरान मलिकच्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

 मुंबई, 05 जानेवारी : उमरान मलिकने पुन्हा एकदा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आपल्या वेगाने सर्वांना हैराण केलं आहे. उमरानच्या वेगावर आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे. उमरानने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात 155 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. उमरानच्या वेगवान गोलंदाजीवर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका हा बाद झाला. तसंच हा चेंडू सामन्यातील सर्वात वेगवान चेंडूही ठरला. भारताकडून सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा याआधीचा जसप्रीत बुमराहचा विक्रमही उमरान मलिकने मोडला. बुमराहने आतापर्यंत सर्वात वेगवान चेंडू 153.36 किमी प्रतितास वेगाने टाकले होता.

उमरान मलिक आता भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज झाल्यानंतर त्याची जगभरात चर्चा होत आहे. दिग्गज गोलंदाज त्याच्या वैगाचं कौतुक करत असून काहींनी सल्लाही दिला आहे. आता जगात सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम शोएब अख्तरच्या नावावर असून त्यानेही उमरान मलिकच्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया दिली आहे. शोएब अख्तरने म्हटलं की, "उमरान मलिकने माझा विक्रम मोडल्यास मला आनंद होईल. पण माझा विक्रम मोडताना त्याने आपली हाडे मोडून घेऊ नये. मला असं म्हणायचंय की त्याने तंदुरुस्त रहावं." शोएब अख्तरने 161 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करण्याचा विक्रम केला होता. अद्याप हा विक्रम अबाधित आहे.

हेही वाचा : IND Vs SL : दुसरा टी20 सामना आज, घरच्या मैदानावर दोन पुणेकरांना संधी?

उमरानला शोएब अख्तरचा विक्रम मोडण्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यानं म्हटलं होतं की, सध्या मी फक्त देशासाठी चांगली कामगिरी करण्याबाबत विचार करत आहे. जर मी चांगली कामगिरी केली आणि नशिबवान ठरलो तर मी विक्रम मोडेन. पण मी याबद्दल अजिबात विचार करत नाही. उमरान मलिकच्या वेगाची तुलना नेहमीच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरसोबत होत असते.

टीम इंडियाचा वेगवान युवा गोलंदाज उमरान मलिकने आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून 2022 मध्ये खेळला. या हंगामात त्याने 2022 मध्ये 14 सामने खेळले. त्यानंतर गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी त्याची पहिल्यांदा टीम इंडियात निवड झाली. आतापर्यंत त्याने 5 एकदिवसीय आणि 4 टी20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केलं. एकदिवसीय सामन्यात मलिकने 7 तर टी20मध्ये 4 विकेट घेतल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Cricket, India