मुंबई, 30 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगच्या आठव्या सिझनमध्ये (Pro kabaddi League 2021) गुरूवारी यू मूंबाचा (U Mumba) सामना माजी विजेत्या जयपूर पिंक पँथर्सशी (Jaipur pink panthers) होणार आहे. यू मूंबाचा यापूर्वीचा सामना तामिळ थलायवाजशी झाला होता. या सामन्यात अगदी शेवटच्या क्षणी झालेल्या चुकांमळे मूंबाला बरोबरीत समाधान मानावे लागले. मूंबानं या सिझमध्ये आत्तापर्यंत तीन सामने खेळले असून त्यापैकी एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. एक पराभव आणि एक बरोबरीसह ही टीम पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. तर जयपूरची टीम 3 सामन्यांनंतर 2 विजय आणि 1 पराभवानंतर पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. गुरुवारचा दुसरा सामना हरियाणा स्टीलर्स विरुद्ध बेंगलुरू बुल्स यांच्यात होणार आहे. हरियाणानं 3 पैकी फक्त 1 सामना जिंकला असून 7 पॉईंट्ससह ही टीम नवव्या क्रमांकावर आहे. तर बेंगलुरू बुल्स 3 सामन्यांमध्ये 2 विजय आणि एक पराभवासह सहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंड टीममध्ये वाढलं कोरोनाचं संकट, सिडनी टेस्टपूर्वी बसला मोठा धक्का PKL 8 मध्ये 30 डिसेबर रोजी किती सामने आहेत? पीकेएल-8 मध्ये 30 डिसेंबर रोजी 2 सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना यू मूंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात होईल. तर दुसरा सामना हरियाणा स्टील्स विरुद्ध बेंगलुरू बुल्स यांच्यात होणार आहे. PKL 8 मधील आजचे सामने कधी सुरू होतील? आज दोन सामने आहेत. पहिला सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दुसरा त्यानंतर बरोबर एक तासांनी म्हणजेच रात्री 8.30 वाजता सुरू होईल. PKL 8 मधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल? भारतामध्ये या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’ वर पाहता येणार आहे. PKL 8 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? डिस्नी+हॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवर कबड्डी मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.