मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ashes Series : इंग्लंड टीममध्ये वाढलं कोरोनाचं संकट, सिडनी टेस्टपूर्वी बसला मोठा धक्का

Ashes Series : इंग्लंड टीममध्ये वाढलं कोरोनाचं संकट, सिडनी टेस्टपूर्वी बसला मोठा धक्का

ऑस्ट्रेलिया विरुद्धची अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) 3 टेस्टमध्येच गमावल्यानंतर इंग्लंड क्रिकेट टीम आता कोरोना संकटात (Coronavirus) सापडली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) 3 टेस्टमध्येच गमावल्यानंतर इंग्लंड क्रिकेट टीम आता कोरोना संकटात (Coronavirus) सापडली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) 3 टेस्टमध्येच गमावल्यानंतर इंग्लंड क्रिकेट टीम आता कोरोना संकटात (Coronavirus) सापडली आहे.

मुंबई, 30 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्धची अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) 3 टेस्टमध्येच गमावल्यानंतर इंग्लंड क्रिकेट टीम आता कोरोना संकटात (Coronavirus) सापडली आहे. जो रूटच्या (Joe Root) टीमला प्रतिष्ठा राखण्यासाठी उर्वरित दोन टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. टीमच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचे हेड कोच ख्रिस सिल्वरवूड ( Chris Silverwood) सिडनीमध्ये होणाऱ्या चौथ्या टेस्टसाठी उपलब्ध नसतील.

सिल्वरवूड यांच्या कुटुंबातील एकाला कोरनाची लागण झाली आहे. या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. सिल्वरवूड त्यांच्या कुटंबासह मेलबर्नमध्येच 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहतील. चौथी टेस्ट सिडनीमध्ये पाच जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्याला कोरोना झाल्याचे बुधवारी आढळून आले. कोच सिल्वरवूड यांना याची लागण झाली आहे का? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजलेली नाही.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील इंग्लंड कॅम्पमधील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता सात झाली आहे. यापैकी तीन जण सपोर्ट स्टाफमध्ये आहेत. तर चार जण कुटुंबातील सदस्य आहेत. मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी झालेल्या टेस्टमध्ये त्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले. दोन्ही देशांचे खेळाडू शुक्रवारी सिडनीसाठी रवाना होतील. सिडनी टेस्ट नियोजित वेळापत्रकानुसारच होईल असा विश्वास 'क्रिकेट ऑस्ट्रेलियानं' व्यक्त केला आहे.

Ranji Trophy: टीम इंडियातून बाहेर असलेला खेळाडू बनला माजी विजेत्या टीमचा कॅप्टन

इंग्लंडची निराशाजनक कामगिरी

कोच सिल्वरवूड यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडनं 2021 मध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांनी यावर्षी 9 टेस्ट गमावल्या जो एक रेकॉर्ड आहे.  इंग्लंडने बांगलादेशच्या लाजिरवाण्या रेकॉर्डची बरोबरी केली. बांगलादेशने एका वर्षात 9 कसोटी सामने गमावलेले आहेत. इंग्लंडने यापूर्वी 1984, 1986, 1993 आणि 2016 मध्येही आठ टेस्ट गमावल्या होत्या.

अ‍ॅशेस सीरिज आम्हाला जोरदार पुनरागमन करावं लागेल आणि पुढील दोन सामने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल, असे इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं म्हटलं आहे.

First published:

Tags: Ashes, Coronavirus, England