मुंबई, 2 जानेवारी : प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro kabaddi League 2021) रविवारी 2 मॅच होणार आहेत. पहिली मॅच गुजरात जायंट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (Gujarat Giants vs Haryana Steelers) यांच्यात होणार आहे. तर पुणेरी पलटण विरुद्ध बेंगुलरू बुल्स (Puneri Paltan vs Bengaluru Bulls) यांच्यात होईल.
प्रो कबड्डीच्या पॉईंट्स टेबलमघ्ये दंबग दिल्ली 21 पॉईंट्ससह टॉपवर आहे. तर बेंगलुरू बुल्स 5 मॅचनंतर 3 विजय आणि 1 बरोबरी सह 18 पॉईंट्स कमावत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यू मुंबा 17 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबानं 5 पैकी 2 मॅच जिंकल्या असून 2 ड्रॉ केल्या आहेत.
पुणेरी पलटणनं 4 मॅचनंतर फक्त 1 विजय मिळवला असून 3 मॅचमध्ये पराभव पत्करला आहे. पलटण सध्या 5 पॉईंट्ससह शेवटच्या क्रमांकावर आहेत. आजच्या मॅचमध्ये पुणेरी पलटणला विजय मिळवायचा असेल तर कॅप्टन नितीन तोमरसह सर्वांनाच खेळ उंचवावा लागेल.
युपी योद्धा-यू मुंबाचा रोमांचक सामना ड्रॉ, अजिथ कुमारचा पुन्हा धमाका!
PKL 8 मध्ये 2 जानेवारी रोजी किती सामने आहेत?
पीकेएल-8 मध्ये 2 जानेवारी रोजी 2 सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना गुजरात जायंट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यात होईल. तर दुसरा सामना पुणेरी पलटण विरुद्ध बेंगलुरू बुल्स यांच्यात होणार आहे.
PKL 8 मधील आजचे सामने कधी सुरू होतील?
आज दोन सामने आहेत. पहिला सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दुसरा त्यानंतर बरोबर एक तासांनी म्हणजेच रात्री 8.30 वाजता सुरू होईल.
PKL 8 मधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
भारतामध्ये या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण 'स्टार स्पोर्ट्स नेटवर्क' वर पाहता येणार आहे.
PKL 8 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
डिस्नी+हॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवर कबड्डी मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league