मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Pro Kabaddi League: पवनचं 'वादळ' बंगाल रोखणार? पाहा कधी आणि कुठे होणार आजचे सामने

Pro Kabaddi League: पवनचं 'वादळ' बंगाल रोखणार? पाहा कधी आणि कुठे होणार आजचे सामने

प्रो कबड्डी लीगमध्ये  (Pro Kabaddi League-2021) रविवारी दोन सामने होणार आहेत. यामध्ये बेंगलुरुचा कॅप्टन पवन सेहरावतला (Pawan Sehrawat) रोखण्यासाठी बंगाल वॉरियर्सला विशेष रणनीती आखावी लागणार आहे.

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League-2021) रविवारी दोन सामने होणार आहेत. यामध्ये बेंगलुरुचा कॅप्टन पवन सेहरावतला (Pawan Sehrawat) रोखण्यासाठी बंगाल वॉरियर्सला विशेष रणनीती आखावी लागणार आहे.

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League-2021) रविवारी दोन सामने होणार आहेत. यामध्ये बेंगलुरुचा कॅप्टन पवन सेहरावतला (Pawan Sehrawat) रोखण्यासाठी बंगाल वॉरियर्सला विशेष रणनीती आखावी लागणार आहे.

मुंबई, 26 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगमध्ये  (Pro Kabaddi League-2021) रविवारी दोन सामने होणार आहेत. पहिली लढत गुजरात जायंट्स विरुद्ध दबंग दिल्ली (Gujarat Giants vs Dabang Delhi) यांच्यात होत आहे. दिल्लीचा नवीन कुमार (Naveen Kumar) चांगलाच फॉर्मात आहे. नवीनं या प्रो कबड्डी लीगमध्ये सलग 23 व्या मॅचमध्ये नवीननं सुपर 10 ची कमाई केली आहे. तसेच सर्वात कमी मॅचमध्ये (47) 500 पॉईंट्सचा टप्पा ओलांडला आहे. नवीनच्या दमदार खेळामुळे दिल्ली पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर आहे. फॉर्मातील 'नवीन एक्स्प्रेस' ला रोखण्यासाठी गुजरातच्या डिफेंडर्सना खेळ उंचवावा लागणार आहे.

दुसऱ्या मॅचमध्ये गतविजेत्या बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) समोर बेंगलुरू बुल्सचं (Bengaluru Bulls) आव्हान आहे. बेंगलुरुनं या स्पर्धेतील दोन पैकी एक मॅच जिंकली असून एक गमावली आहे. बेंगलुरुचा कॅप्टन पवन सेहरावत (Pawan Sehrawat) याने 2 मॅचमध्ये 18 रेड पॉईंट्स मिळवले होते. त्यामुळे पवनचं वादळ रोखण्यासाठी वॉरियर्सना विशेष रणनीती आखावी लागणार आहे. बंगालची भिस्त ही अनुभवी मणिंदर सिंहवर असून त्याने पहिल्या 2 मॅचमध्ये 12 रेड पॉईंट्सची कमाई केली आहे.

 कोल्हापूरच्या सिद्धार्थची धमाका अपयशी, पुणेरी पलटणचा विजय

PKL 8 मध्ये 26  डिसेबर रोजी किती सामने आहेत?

पीकेएल-8 मध्ये 26 डिसेंबर रोजी 2 सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना गुजरात जायंट्स  विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यात होईल. तर दुसरा सामना बंगाल वॉरियर्स विरुद्ध बेंगलुरु बुल्स यांच्यात होणार आहे.

PKL 8 मधील आजचे सामने कधी सुरू होतील?

आज तीन सामने आहेत. पहिला सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दुसरा त्यानंतर बरोबर एक तासांनी सुरू होईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना रात्री 9.30 वाजता खेळला जाणार आहे.

PKL 8 मधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

भारतामध्ये या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण 'स्टार स्पोर्ट्स नेटवर्क' वर पाहता येणार आहे.

PKL 8 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

डिस्नी+हॉटस्टार ऍप आणि वेबसाईट कबड्डी मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league, Sports