जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Pro Kabaddi League : कोल्हापूरच्या सिद्धार्थची धमाका अपयशी, पुणेरी पलटणचा विजय

Pro Kabaddi League : कोल्हापूरच्या सिद्धार्थची धमाका अपयशी, पुणेरी पलटणचा विजय

Pro Kabaddi League-2021

Pro Kabaddi League-2021

प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणचा सामना तेलुगू टायटन्सशी (Puneri Paltans vs Telugu Titans) होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरू, 25 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणचा सामना तेलुगू टायटन्सशी (Puneri Paltans vs Telugu Titans) होत आहे. पहिल्या मॅचमध्ये फार कमाल करू न शकलेल्या पुणेरी पलटणला (Puneri Paltan) विजयाची संधी आहे. हा विजय मिळवण्यासाठी त्यांना सिद्धार्थ बाहुलबली देसाईचा (Siddarth Desai) अडथळा पार करावा लागणार आहे. सिद्धार्थ हा तेलुगू टायटन्स (Telugu Titans) मुख्य रेडर आहे. त्याला रोखण्यासाठी पुण्याची टीम काय योजना बनवेल यावर या मॅचचं भवितव्य ठरेल. पुणेरी पलटणचा पहिल्या मॅचमध्ये दबंग दिल्ली विरुद्ध पराभव झाला होता. तर तेलुगु टायटन्स आणि तामिळ थलयवाजची मॅच बरोबरीत सुटली होती. कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईला (Siddharth Desai) तेलुगू टायटन्सने 1 कोटी 30 लाखांची बोली लावून टीममध्ये घेतलं. सिद्धार्थला रिटेन करण्यासाठी टायटन्सला एफबीएम कार्डचा वापर करावा लागला. सिद्धार्थ देसाईची बेस प्राईज 30 लाख रुपये होती. मागच्या लिलावाच्या तुलनेत सिद्धार्थ देसाईला कमी रक्कम मिळाली. 2019 च्या लिलावात तेलुगू टायटन्सने त्याला 1.45 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. 2018 च्या मोसमात सिद्धार्थला यू मुंबाने फक्त 36.4 लाख रुपयांना खरेदी केली होतं. या मोसमात त्याने धमाकेदार कामगिरी केल्यामुळे पुढच्या लिलावात त्याच्यावर कोट्यवधींची बोली लागली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात