सुप्रितीने जिंकलेल्या या पदकानंतर तिच्या आई बालमती देवी भावुक झाल्या. त्यांचे पती आणि सुप्रितीचे वडिल नक्षली हल्ल्यात ठार झाले. त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरत त्यांनी सुप्रितीला भक्कम साथ दिली आणि तिने हे यश मिळवलं. इंडियन एक्सप्रेस या दैनिकाशी बोलताना बालमती देवी म्हणाल्या, “सुप्रिती चालायलाही शिकली नव्हती तेव्हा तिच्या वडिलांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. मला माझ्या मुलांचं पालनपोषण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. सुप्रितीला धावायला आवडतं आणि वडील असते तर त्यांना आज माझा अभिमान असता, असं ती मला सांगायची. मला माहितीये की तिचे वडील जिथे असतील तिथून आम्हाला बघत असतील. आता आम्ही घरी गेल्यानंतर तिचं पदक आमच्या बुरहू गावातल्या घरी ठेवू.”
नक्षलवाद्यांकडून वडिलांची हत्या
डिसेंबर 2003 मध्ये सुप्रितीचे वडील रामसेवक ओरान यांना नक्षलवाद्यांनी ठार मारलं. ते डॉक्टर होते आणि चार लोकांसोबत जवळच्या गावात एका रुग्णावर उपचार करायला गेले होते. परंतु, दुसर्या दिवशी सर्वांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले आणि त्यांच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा होत्या. बालमती आपल्या पाच मुलांसह पतीच्या येण्याची वाट पाहत होत्या. परंतु, त्यांना पतीच्या निधनाची बातमी मिळाली. पती गेल्यानंतर पाच मुलांना वाढवण्यासाठी त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. काही काळाने त्यांना गुमला येथील घाग्रा ब्लॉकमधील ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसमध्ये नोकरी मिळाली आणि त्या कुटुंबासह सरकारी क्वार्टरमध्ये राहायला गेल्या.
असं बदललं नशीब
सुप्रितीला नुक्रडिप्पा चैनपूर शाळेत दाखल करण्यात आलं होतं, तिथं ती मातीच्या ट्रॅकवर धावत होती. नंतर तिला गुमला येथील सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये दाखल करण्यात आलं. तिला स्कॉलरशिपमुळे तिथे प्रवेश मिळाला, नंतर इंटर स्कूल स्पर्धेत प्रशिक्षक प्रभात रंजन तिवारी यांनी तिला हेरलं आणि ट्रेनिंग देण्यास सुरूवात केली. 2015 मध्ये त्यांनी तिला झारखंड स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देणं सुरू केलं. सुप्रितीबद्दल तिवारी म्हणाले, "ती आधी 400 मीटर आणि 800 मीटर धावायची; पण जेव्हा तिने इथे प्रशिक्षण सुरू केले, तेव्हा ती लांब पल्ल्यासाठी धावू लागली. त्यावरून तिचा हृदयाचा ठोका वाढत नसल्याचं लक्षात आलं आणि मी तिला 1500 मीटर धावायला लावलं, त्यानंतर 3 हजार मीटर शर्यतीत ती धावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Naxal Attack, Sports