मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवने महाराष्ट्राची मान उंचावली; विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झालेली एकमेव भारतीय

कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवने महाराष्ट्राची मान उंचावली; विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झालेली एकमेव भारतीय

आशियाई टेनिस फेडरेशनतर्फे (Asian Tennis federation) इंग्लंडमधल्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची (Aishwarya Jadhav) निवड करण्यात आली आहे.

आशियाई टेनिस फेडरेशनतर्फे (Asian Tennis federation) इंग्लंडमधल्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची (Aishwarya Jadhav) निवड करण्यात आली आहे.

आशियाई टेनिस फेडरेशनतर्फे (Asian Tennis federation) इंग्लंडमधल्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची (Aishwarya Jadhav) निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 9 जून : आशियाई टेनिस फेडरेशनतर्फे (Asian Tennis federation) इंग्लंडमधल्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची (Aishwarya Jadhav) निवड करण्यात आली आहे. एक जुलैपासून ही अंडर-14 टुर्नामेंट (U-14 Wimbledon Tennis tournament) सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेतल्या आशियाई टीममध्ये असलेली ऐश्वर्या ही एकमेव भारतीय (Only Indian in Asian Team) आहे. क्रिकेटमध्ये लॉर्ड्सच्या मैदानाला ज्याप्रमाणे मानाचं स्थान आहे, त्याचप्रमाणे टेनिसमध्ये विम्बल्डन ग्रास कोर्ट्सना मोठं स्थान आहे. इथे खेळण्याचं स्वप्न जगभरातले खेळाडू पाहत असतात. ऐश्वर्याचं हे स्वप्न अगदी लहान वयातच पूर्ण होत आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अंडर-14 मध्ये आहे ‘नंबर वन’ 14 वर्षं वयोगटातल्या मुलींमध्ये ऐश्वर्या सध्या भारतातली पहिल्या क्रमांकाची (India’s number one Tennis player under 14) खेळाडू आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच ती विविध स्पर्धांमध्ये जिंकत आली आहे. एप्रिलमध्ये दिल्ली येथे झालेल्या आशिया/ओशियानिया (Asia/Oceania) वर्ल्ड ज्युनियर टेनिस कॉम्पिटिशन (अंडर-14 मुली) या स्पर्धेत तिने नेत्रदीपक कामगिरी केली होती. यानंतर कोल्हापुरातच झालेल्या अंडर-16 ज्युनियर टेनिस नॅशनल्स (Under 16 junior Tennis nationals) स्पर्धेत डबल्स प्रकारात तिने विजय मिळवला होता. “ऐश्वर्याने (Aishwarya Jadhav Kolhapur) विम्बल्डनला खेळावं असं माझं स्वप्न होतं. हे आता प्रत्यक्षात घडतंय हे पाहून आम्ही खूप खूश आहोत. हे घडतंय यावर अजूनही आमचा विश्वास बसत नाहीये,” असं मत ऐश्वर्याच्या आईने व्यक्त केलं. “ती ज्या प्रकारे अधिकाधिक चांगली खेळाडू बनत आहे, ते पाहून आम्हाला तिचा अभिमान वाटतो,” असंही त्या म्हणाल्या. राज्याचा आणि कोल्हापूरकरांचा कायम पाठिंबा ऐश्वर्याने अर्शद आणि मनल देसाई या भावंडांच्या ‘अर्शद देसाई टेनिस अ‍ॅकॅडमी’मध्ये प्रशिक्षण (Aishwarya Jadhav Coach) घेतलं आहे. “कोल्हापूरसारख्या छोट्या शहरातून थेट विम्बल्डनला जाणं ही खरंच मोठी झेप आहे. ऐश्वर्याने ती उत्तम टेनिसपटू आहे हे वेळोवेळी दाखवून दिलं आहे. हा क्षण आमच्यासाठी प्रशिक्षक म्हणून अगदी अभिमानाचा आहे,” असं मत अर्शद यांनी या वेळी व्यक्त केलं. ऐश्वर्याच्या या प्रवासात महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन (MSLTA) आणि कोल्हापूरच्या नागरिकांचाही भरपूर पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं. आणखी दोन मोठ्या स्पर्धांवर लक्ष ऐश्वर्याच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची युरोपातल्या ग्रँड स्लॅम प्लेयर डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठीही (Grand Slam Player Development Programme) निवड झाली आहे. सोबतच, झेक रिपब्लिकमध्ये होणाऱ्या वर्ल्ड ज्युनियर कॉम्पिटिशनमध्ये (World Junior Competition) सहभागी होण्यासाठीही तिची तयारी सुरू आहे. यासाठी आवश्यक तो निधी वेळेत उभा झाला असून, पेपरवर्क वेळेत पूर्ण होईल, अशी आशा या वेळी तिच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली.
First published:

Tags: Kolhapur, Wimbledon

पुढील बातम्या