मुंबई, 8 जुलै: एका हातामध्ये बिअर आणि दुसऱ्या हातामध्ये लहान मुलगी घेऊन मॅच पाहत असलेल्या वडिलांनी केलेल्या कृतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. बेसबॉल मॅचचा आनंद घेत असलेल्या या व्यक्तीच्या दिशेनं अचानक बॉल आला. त्यावेळी त्याचे दोन्ही हात मोकळे नव्हते, तरीही त्याला तो कॅच सोडायचा नव्हता. त्या व्यक्तीने एका क्षणाचा विचार न करता मुलीला सोडले आणि कॅच पकडला. तो कॅच पकडल्यानंतरही त्याचे जजमेंट कायम होते. त्याने नंतर लगेच कॅच घेतलेल्या हाताने खाली पडत असलेल्या मुलीला पकडले. अवघ्या एका क्षणात डोळ्याचं पात लवण्यापूर्वी या व्यक्तीनं कॅच, बिअर आणि मुलगी या तीन्ही गोष्टी पकडल्या. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Wait, did I just see this guy a) drop his baby, b) catch the ball, C) catch the falling baby, & D) not spill his beer?! Grasshopper! That’s some Jedi/Kung Fu dad ish! pic.twitter.com/IKUuKDAiB6
— @jason (@Jason) July 5, 2021
या व्यक्तीचे नाव अद्याप समजले नसले तरी हा व्हिडीओ अमेरिकेतील बेसबॉल मॅचमधला (baseball game) आहे. काही जणांनी हा व्हिडीओ पाहून या व्यक्तीच्या चपळतेचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. 278 बॉलमध्ये नाबाद 37! दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवी बॅट्समननं दिवसभर खेळत टाळला पराभव या व्हिडीओतील व्यक्ती ही निष्काळजी पालक आहे. अमेरिकेत बेसबॉलचं वेड इतकं आहे की त्यासाठी बाप आपल्या मुलीला टाकून देईल, या मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले तरी ती किती घाबरल्याचं समजतं, या मुलीच्या आईनं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या निष्काळजी बापाची काही खैर नाही, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.