मुंबई, 8 जुलै: सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये सिक्स आणि फोरचा वर्षाव ही सामान्य बाब आहे. त्यामुळे एका ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन, वेगवान अर्धशतक , शकत हे रेकॉर्ड सातत्याने होत आहेत. त्याचवेळी काही बॅट्समन आजही असे आहेत की जे गरज पडली तर टीमसाठी संयमी बॅटींग करु शकतात. मैदानात एका बाजूने नांगर टाकून मॅच वााचवण्याची जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतात. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज बॅट्समन हाशिम अमलाने (Hashim Amla) फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वात संथ खेळीमधील (Slowest Innings in First Class Cricket) एक खेळी खेळली आहे. सरे विरुद्ध हॅम्पशायर काऊंटी मॅचमध्ये अमलानं सरेकडून ही खेळी खेळली. त्याने संपूर्ण दिवस बॅटींग करत 278 बॉलमध्ये नाबाद 37 रन काढले. अमलाच्या या खेळीमुळे सरेनं दिवसअखेर 8 आऊट 128 रन काढले. त्यामुळे ही मॅच अखेर ड्रॉ झाली. अमलाचा रेकॉर्ड अमलाच्या नाबाद 37 रनच्या खेळीमुळे त्याच्या टीमनं पराभव टाळला. त्याचबरोबर एक खास रेकॉर्ड देखील केला. त्याने या इनिंगमध्ये 278 बॉलचा सामना केला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 40 पेक्षा कमी रनसाठी एखाद्या बॅट्समननं हे सर्वात जास्त बॉलचा सामना केला आहे.
Most balls faced in a first-class innings of less than 40:
— Andrew Samson (@AWSStats) July 7, 2021
278 HM Amla (37*) Surrey v Hampshire Southampton 2021
277 TE Bailey (38) England v Australia Leeds 1953
(where balls faced are known)
सरेला ‘फॉलो ऑन’ मिळाल्यानंतर त्यांची सुरुवात खराब झाली. फक्त 6 रनमध्ये त्यांनी दोन्ही ओपनिंग बॅट्समन गमावले. 2 आऊट 6 या धावसंख्येवरुन सरेनं शेवटच्या दिवशी खेळ सुरु केला. त्यावेळी त्यांची टीम पराभवाच्या छायेत होती. मात्र अमलानं इतर बॅट्समनच्या मदतीनं हे संकट टाळलं. सरेनं शेवटच्या दिवशी संख खेळ केला. त्यांच्या 10 पैकी फक्त एका बॅट्समननं 30 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं रन काढले. अमलाच्या या झुंजार खेळीबद्दल त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. Happy Birthday Ganguly : गांगुली-कॉनवेमध्ये एकाच दिवशी वाढदिवसासह 6 योगायोग, वाचून व्हाल हैराण भारताविरुद्ध केली होती खेळी हाशिम अमलानं यापूर्वी भारताविरुद्धच्या टेस्टमध्येही (SA vs IND Test) या प्रकारची बॅटींग केली होती. त्यावेळी त्याने 244 बॉलमध्ये 25 रन काढले होते. अमलाच्या जोडीनं एबी डीव्हिलियर्सनं 297 बॉलमध्ये 43 रन काढत दक्षिण आफ्रिकेचा पराभव टाळला होता.