नवी दिल्ली, 29 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज (South African spinners Keshav Maharaj) लव्हस्टोरीची चर्चा क्रिकेट जगतात अधिक रंगली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज याची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. केशवला लेरीशासोबत लग्न करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्याच्यासमोर सर्वात मोठी अडचण होती ती घरच्यांना पटवण्याची. वडीलधाऱ्यांची संमती मिळवण्यासाठी त्याने खास दिवस निवडला. तो दिवस म्हणजे केशवच्या आईचा 50 वा वाढदिवस. केशव आणि लेरीशा यांची पहिली भेट कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली. त्यांची दोन्ही कुटुंबे भारतातून दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला एकमेकांत मिसळायला वेळ लागला नाही. केशव जेव्हा कधी आफ्रिकेत खेळायचा तेव्हा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी लेरीशा मैदानात पोहोचायची. डेटिंगनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. फिंचला क्लिन बोल्ड केल्यानंतर सकारियाचे ‘गोकू स्टाईल’ सेलिब्रेशन, VIDEO वाढदिवसाच्या पार्टीसाठी, केशव आणि लेरीशा यांनी एकत्र कथ्थकचा परफॉर्मन्स दिला. ठरलेल्या दिवशी दोघांनी भारतीय पारंपारिक वेशभूषा परिधान करुन परफॉर्म केला. दोघांमधील केमिस्ट्री पाहून केशवच्या आईला समजले की तिला तिची भावी सून सापडली आहे. केशवने भारतीय संस्कृतीशी निगडीत अशी मुलगी निवडली याचा तिला खूप आनंद झाला. भारतीय वंशाची लेरीशा कथ्थकमुळे दक्षिण आफ्रिकेत लोकप्रिय आहे. कथ्थकच्या पारंपारीक वेशभूषामधील तिचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र, केशवशी ओळख झाल्यानंतर त्यांनी एकमेकांनी डेटिंग करण्यास सुरुवात केली. एके दिवशी केशव आधीच ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. खूप वाट पाहिली. लेरीशा खूप उशिरा आली. पण ती आल्यावर चेहऱ्यावर हसू घेऊन आली. त्यांना पाहून केशव काहीच बोलू शकला नाही. हाच तो काळ होता जेव्हा दोघांनाही कळले होते की त्यांच्यात एक खास नातं असणार आहे.
केशव आणि लेरीशाचे लग्न खूप आधी झाले असते पण कोविड-19 नंतर आजीच्या मृत्यूमुळे ते पुढे ढकलण्यात आले. या धक्क्यातून दोघांच्या कुटुंबीयांना बाहेर यायला वेळ लागला. केशव महाराज यांनी दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 42 कसोटी सामने खेळून 150 विकेट्स घेतल्या आहेत. तो फक्त तो आफ्रिकेतील आघाडीच्या फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे जो आशियाई खेळपट्ट्यांवरही चांगली कामगिरी करत आहे. केशवने 21 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. जिथे त्याने 21 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 6 विकेट आहेत.