जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफसाठी Smriti Mandhana ची खास पोस्ट, भारताकडून खूप सारं प्रेम...

पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफसाठी Smriti Mandhana ची खास पोस्ट, भारताकडून खूप सारं प्रेम...

Smriti Mandhana hails Bismah Maroof

Smriti Mandhana hails Bismah Maroof

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Women’s World Cup 2022) टीम इंडियानं दमदार सुरूवात केली आहे. भारतीय टीमनं पाकिस्तानचा 107 रननं दणदणीत पराभव केला आहे. मात्र, क्रिकेट जगतात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे पाकिस्तान संघाची कर्णधार बिस्माह मारूफची (Bismah Maroof).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 मार्च: न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Women’s World Cup 2022) टीम इंडियानं दमदार सुरूवात केली आहे. भारतीय टीमनं पाकिस्तानचा 107 रननं दणदणीत पराभव केला आहे. मात्र, क्रिकेट जगतात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे पाकिस्तान संघाची कर्णधार बिस्माह मारूफची (Bismah Maroof). यामुळे भारताच्या सर्वच खेळाडूंबरोबर स्मृती मानधनाही (Smriti Mandhana) बिसमाह मारूफची फॅन बनली आहे. तिने तिच्यासाठी खास पोस्ट केली आहे. मॅच संपल्यावर भारतीय खेळाडू पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफच्या (Bismah Maroof) लहान मुलीला भेटले. बिस्माहच्या 6 महिन्यांच्या मुलीला भारतीय क्रिकेटपटूंनी खेळवलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचदरम्यानचा एक फोटो पोस्ट करत आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीली आहे. ‘बाळाला जन्म दिल्यानंतर सहा महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणे हे खूप प्रेरणादायी आहे. बिसमाह मारूफने जगभरतील महिला खेळाडूंसमोर एक उदाहरण ठेवले आहे.’ स्मृती आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पुढे लिहिते की, ‘फातिमाला भारताकडून खूप सारं प्रेम. आशा आहे की ती देखील तुमच्यासारखी हातात बॅट घेईल कारण डावखुरे खेळाडू विशेष असतात.’ अशा आशयाची पोस्ट स्मृतीने लिहीली आहे. जी सध्या व्हायरल होत आहे.

News18

कोणत्याही महिला खेळाडूला आई झाल्यानंतर मैदानात पुनरागमन करणं कठीण असतं, पण बिस्माहने आई झाल्यानंतरही खेळण्याचा निर्णय घेतला. गरोदर असताना बिस्माहने निवृत्ती घ्यायचं ठरवलं होतं, पण कुटंब आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिला खूप मदत केली. पीसीबीने काही वर्षांपूर्वी खेळाडूंसाठी पालकत्व धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला. या धोरणाचा फायदा घेणारी बिस्माह पहिली क्रिकेटपटू ठरली. पीसीबीच्या या धोरणामुळे खेळाडूंना 12 महिन्यांची पेड लिव्ह आणि करार विस्ताराची हमी मिळते. या कारणामुळे बिस्माहचं पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं. स्मृती मानधना देखील डावखुरी फलंदाज आहे. या मॅचदरम्यान स्मृती मानधनाने 75 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत तिने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. स्मृतीने तिच्या वनडे करीयरमधलं 21 व अर्धशतक झळकावलं. आयसीसी महिला वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील भारताचं हे पहिलं अर्धशतक आहे. वर्ल्डकपच्या इतिहासातील स्मृतीचं हे तिसरं अर्धशतक आहे. पाकिस्तान विरोधात स्मृतीचं हे पहिलं अर्धशतक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात