मुंबई, 18 जानेवारी : न्यूझीलंड संघ सध्या भारत दौऱ्यावर असून यांच्यात सध्या वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. आज हैद्राबाद येथे वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. अतिशय अतितटीच्या या सामन्यात भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिल याने शतक ठोकले आहे. शुभमन गिलचे वनडे सामन्यातील हे सलग दुसरे शतक असून या सामन्यात तो भारतीय संघाचा तारणहार ठरला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु भारताची फलंदाजीची सुरुवात फार काही चांगली राहिली नाही. सलामीसाठी आलेला कर्णधार रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात असूनही 38 चेंडूवर 34 धावा करत झेलबाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयन्त केला, परंतु विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. हे ही वाचा : रिषभ पंत वर्ल्ड कप पूर्वी होणार फिट? प्रकृती संदर्भात आली ही महत्वाची अपडेट विराट कोहली 10 चेंडूत 8 धावांची खेळी करून माघारी परतला. यावेळी शुभमनने भारतीय संघाचा डाव सावरला आणि केवळ 88 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शुभमन गिलचे वनडे सामन्यातील हे दुसरे शतक ठरले. तर आंतरराष्ट्रीय सामन्यातील गिलचे हे चौथे शतक ठरले. यापूर्वी देखील श्रीलंके विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात गिलने शतक ठोकत मालिका गाजवली होती. सध्याच्या घडीला भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेत शुभमन गिलने 103 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या आहेत. 50 ओव्हर पूर्ण होत असताना भारत न्यूझीलंड संघाला किती धावांचे आव्हान देतो हे पाहणं महत्वाचं असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.