मुंबई, 11 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात शुभमन गिलने पुन्हा एकदा त्याचा जबरदस्त फॉर्म दाखवून दिला आहे. शुभमनने अहमदाबाद क्रिकेट स्टेडियमवर कसोटी क्रिकेटमधील त्याचे दुसरे शतक ठोकले आहे. याशतकासह शुभमन टीम इंडियाच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल सध्या चांगल्या फॉर्मात नसल्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत युवा क्रिकेटर शुभमन गिलला संधी देण्यात आली. शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्याने यावर्षी न्यूझीलंड आणि श्रीलंके विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेत शतकांची माळ लावली होती.
शुभमनला इंदूर येथील कसोटी सामन्यात भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये संधी मिळाली होती. परंतु तो फलंदाजीत भारतासाठी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. तर तिसऱ्या कसोटीत भारताला देखील ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. अहमदाबाद येथील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत असताना भारताच्या गोलंदाजांना लोळवत 480 धावांचा डोंगर उभारला होता. अशातच स्टार फलंदाजांकडून मोठी खेळी करण्याची अपेक्षा आहे. रोहित शर्मा अवघ्या 35 धावा करून बाद झाल्यावर शुभमन गिलने चेतेश्वर पुजाऱ्याच्या साथीने संघाची कमान सांभाळली. शुभमनने आपले दुसरे कसोटी शतक 194 चेंडूत पूर्ण केले असून यादरम्यान गिलने 10 चौकार आणि 1 षटकार मारला. अखेर शुभमनने केला प्रेमाचा खुलासा! या अभिनेत्रीच नाव घेतल्याने सर्वांनाच बसला धक्का 2019 मध्ये शुभमनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. शुभमनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 15 सामने खेळले असून यात त्याने 867 धावा केल्या आहेत. यात त्याने 4 अर्धशतक आणि 2 शतक ठोकली आहेत. शुभमनचे कसोटी सामन्यात पहिले शतक गेल्यावर्षी बांगलादेश विरुद्ध ठोकले होते.

)







