शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्याने काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड आणि श्रीलंके विरुद्धच्या टी २० आणि वनडे मालिकेत शतकीय कामगिरी केली. तर तो सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत देखील भारतीय संघाचा भाग आहे.
शुभमनच नाव कधी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तर कधी अभिनेत्री सारा अली खान सोबत जोडलं जात. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान सोबत त्याच्या एअरपोर्ट वरील भेटीचे फोटो समोर आले होते. यात शुभमन आणि सारा मीडियाच्या कॅमेरांपासून वाचताना दिसले.
व्हॅलेंटाईन डे च्या सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल या दोघांनी पोस्ट केलेल्या फोटोचे मागील बॅकग्राउंड सारखेच होते. त्यामुळे सर्वांना हे दोघे तेथे एकमेकांसोबत आल्याचा संशय आला होता. परंतु शुभमनने तो नक्की कोणत्या साराला देत करतोय याबाबत खुलासा केलेला नाही.
मुलाखतीदरम्यान महिलेने शुभमनला तुझं क्रश कोण आहे? असा प्रश्न केला होता. तेव्हा त्याने पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाच नाव घेतलं.
शुभमच्या या उत्तराने सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं. 'पुष्पा' फेम रश्मिका मंदाना ही अभिनेत्री सध्या नॅशनल क्रश बनली आहे. या उत्तरामुळे शुभमन देखील तिच्या प्रेमात असल्याचे कळते.