मुंबई, 14 मार्च : भारताचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर सध्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याची पाठीची दुखापत पुन्हा बळावली असून यामुळे त्याला अहमदाबाद येथील ऑस्ट्रेलिया विरुद्धचा चौथा कसोटी सामना देखील अर्ध्यात सोडावा लागला होता. आता श्रेयसच्या या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटचा सामना अर्ध्यात सोडावा लागल्यानंतर श्रेयस अय्यर हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वनडे मालिकेलाही मुकणार असल्याची माहिती मिळाली होती. पण आता श्रेयस वनडे मालिकाच नाही तर आयपीएलला देखील मुकणार असल्याची माहिती मिळत आहे. श्रेयसची दुखापत गंभीर असल्यामुळे तो आता आयपीएलच्या पहिल्या सत्रामध्ये दिसणार नसल्याची माहिती मिळते. IND vs AUS Test : शमी समोर दिलेल्या ‘जय श्रीराम’ च्या नाऱ्यांवर रोहित शर्माने दिले उत्तर, म्हणाला ‘तिथे जे काही घडले…’ एका वृत्तपत्राला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर हा एप्रिलच्या अखेर पर्यंत आयपीएलमध्ये दिसणार नाही. आयपीएल चा 16 वा हंगाम 31 मार्च पासून सुरु होणार आहे. श्रेयस अय्यर हा कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा कर्णधार आहे. तेव्हा श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे आता KKR संघाची चिंता वाढणार आहे. KKR ला श्रेयसच्या अनुपस्थितीमुळे संघासाठी नवा कर्णधार शोधावा लागेल.
अहमदाबाद येथील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्या दरम्यान तिसऱ्या दिवशी पाठीची दुखापत बळावल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या निदर्शनाखाली त्याच्या बऱ्याच टेस्ट करण्यात आल्या. संघाला श्रेयसची रिप्लेसमेंट न मिळाल्यामुळे भारताला तिसऱ्या दिवशी 9 विकेट्स गमावून खेळ थांबवावा लागला होता.