मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट? सर्वात जवळच्या व्यक्तीनं केला मोठा खुलासा

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट? सर्वात जवळच्या व्यक्तीनं केला मोठा खुलासा

30 ऑक्टोबर 2022 रोजी सानिया आणि शोएबने त्यांचा मुलगा इझानचा वाढदिवस एकत्र साजरा केला होता.

30 ऑक्टोबर 2022 रोजी सानिया आणि शोएबने त्यांचा मुलगा इझानचा वाढदिवस एकत्र साजरा केला होता.

30 ऑक्टोबर 2022 रोजी सानिया आणि शोएबने त्यांचा मुलगा इझानचा वाढदिवस एकत्र साजरा केला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 नोव्हेंबर : भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाआणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे क्रीडा विश्वातील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. मात्र, हे जोडपं विभक्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्या जवळच्या एका व्यक्तीने सानिया आणि शोएब यांच्या नात्यावरील चर्चांवर शिक्कामोर्तब केले आहे.

सानिया आणि शोएब अनेक ठिकाणी एकत्र दिसतात, दोघेही एकमेकांसह मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्यात सर्वकाही आलबेल आहे, असं दिसत होतं; पण अचानक सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या विभक्त होण्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या.

हेही वाचा - कशी जुळली सानिया आणि शोएब यांची क्रॉस बॉर्डर Love Story ?

यानंतर आता शोएब मलिक याच्या जवळच्या एका व्यक्तीने सानिया आणि शोएब यांच्या नात्यावरील चर्चांवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच ते वेगळे राहत असल्याचेही सांगितले आहे. सानिया आणि शोएब यांची लव्ह स्टोरी आणि लग्न फार चर्चेचा विषय ठरलं होतं. मुख्य म्हणजे दोघांनीही लग्नबंधनात अडकण्यापूर्वी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते. शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता.

खुलासा कुणी केला -

गेल्या अनेक दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे वेगळे राहत आहेत. त्या दोघांनी आता औपचारिकरित्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. शोएब मलिकच्या पाकिस्तानातील व्यवस्थापन संघाचा सदस्य असलेल्या व्यक्तीने हा खुलासा केला आहे.

हेही वाचा - Sania-Shoaib: पती पत्नी और वो... स्विमिंग पूलमधल्या 'त्या' फोटोंमुळे सानिया-शोएबच्या नात्यात दुरावा?

तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडलं होतं. सानिया आणि शोएब यांनी 12 एप्रिल 2010 रोजी लग्न केलं. त्यानंतर, 30 ऑक्टोबर 2018 रोजी सानियाने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचं नाव इझान मिर्झा मलिक असं ठेवलं.

दरम्यान, 30 ऑक्टोबर 2022 रोजी सानिया आणि शोएबने त्यांचा मुलगा इझानचा वाढदिवस एकत्र साजरा केला होता. त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा आणखी वाढल्या. इझानच्या चौथ्या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो शोएबने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. पण सानियाने सेलिब्रेशनची कोणतीही पोस्ट टाकली नव्हती.

तिने फक्त इतरांनी पोस्ट केलेल्या स्टोरी रिशेअर केल्या होत्या. काही फोटोंमध्ये इझान मार्व्हल कॉमिक्समधील थीममध्ये स्पायडरमॅन-कस्टमाइज्ड केक कापताना दिसत होता. या वेळी इझान निळी पॅंट व पांढऱ्या टी-शर्टमध्ये सुंदर दिसत होता. दुसरीकडे, शोएब काळ्या टी-शर्ट व जीन्समध्ये दिसला. तर, सानियाने हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

First published:

Tags: Divorce, Sania mirza, Sports