नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी: स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (lata Mangeshkar death) यांचं 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर लतादीदींच्या आठवणीत अनेक सेलिब्रीटी त्यांच्यासोबतचे खास फोटो शेअर करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) लतादीदींसोबतचा एक किस्सा शेअर केला आहे. शोएब अख्तर (Shoaib Akhtar) ने आपल्या युट्यूब चॅनेलवर लतादीदींसोबतचा एक किस्सा शेअर करत त्यांना न भेटण्याची सल कायम मनात राहिल. अशी भावना व्यक्त केली आहे. शोएब म्हणाला, मी 2016 मध्ये भारतात एका कामासाठी आलो होतो. मी लता मंगेशकर यांचा फार मोठा चाहता आहे. त्यावेळी मुंबईत असल्यामुळे माझे लता दीदी यांच्याशी बोलणे झाले होते. लता दीदी फारच प्रेमाने माझ्याशी संवाद साधत होत्या. मी त्यांना जेव्हा लता दीदी, अशी हाक मारली. तेव्हा त्यांनी मला आई म्हणायला सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की, ’ मी तुझ्याशी भेटण्यासाठी फार उत्सुक आहे. मी तुझे आणि सचिन तेंडुलकरचे बरेच सामने पाहिले आहे. तु फारच आक्रमक क्रिकेटपटू आहे आणि आपल्या रागासाठी क्रिकेट विश्वात तुला ओळखले जाते.
On my last visit to India in 2016, i had the pleasure of speaking to her on the phone. She paid heartfelt tributes to Mehdi Hasan sb & Madam Noor Jehan.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) February 6, 2022
There won't be another. #LataMangeshkar .
I've told the conversation details in the video below: https://t.co/70L6UzpJtV pic.twitter.com/k8ZC3oZwZM
तसेच, मी लताजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी नवरात्रीनंतर मला भेटायला ये. आपण भरपूर गप्पा मारुया.’ पण मी त्यांना सांगितले की, नवरात्रीनंतर मी लगेच पाकिस्तानमध्ये निघून जाणार आहे. त्यानंतर त्या थोड्या उदास झाल्या. पण मी त्यांना आश्वासन दिले की, आपण काही दिवसांमध्ये नक्कीच भेटुया. पण आता मी त्यांना कधीच भेटू शकलो नाही. अशी सल कायम माझ्या मनात राहिल अशी भावना शोएबने लतादीदींच्या आठवणीत व्यक्त केली.
लता मंगेशकर यांना क्रिकेटची खूप आवड होती. अनुभवी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्यांना आई म्हणत असे. त्या सचिनची मॅच आवडीने बघायच्या आणि त्याला वेळोवेळी प्रोत्साहनही देत असत. लताजींनी सचिनला भारतरत्न देण्याची मागणी केली. त्याने महेंद्रसिंग धोनीलाही क्रिकेट सोडू नये असे आवाहन केले होते.