मुंबई, 15 मे : भारताचा उगवता वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आपला वेगाने सर्वांनाच चकित करत आहे. तो सातत्याने 150 किमी प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करत आहे. या मोसमात उमरानने आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान 157 किमी प्रतितास चेंडू टाकला आहे. उमरान मलिकच्या गोलंदाजीची सर्वांनाच भुरळ पडली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही उमरानचं कौतुक केलं आहे. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. उमरान मलिकच्या वेगामुळे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर धास्तावला आहे. अख्तरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा 20 वर्ष जुना विक्रम मोडीत निघण्याची भीती त्याला आहे. वास्तविक, अख्तरने स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, माझा विक्रम मोडण्यासाठी उमरानने आपली हाडे मोडू नयेत. 20 वर्षांपासून माझा विक्रम मोडला नाही : अख्तर उमरानबद्दल अख्तर म्हणाला, ‘मला त्याची प्रदीर्घ कारकीर्द बघायची आहे. नुकतेच कोणीतरी माझे अभिनंदन केले की तुमच्या रेकॉर्डला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत कोणीही ते मोडू शकले नाही. तेव्हा मी म्हणालो कि कोणीतरी असायला हवं. हा विक्रम मोडला पाहिजे. त्याने (उमरान) माझा विक्रम मोडला तर मला आनंद होईल. विक्रम तोडण्याच्या नादात हाडे मोडू नका. तो तंदुरुस्त राहो हीच माझी प्रार्थना आहे. दुखापतग्रस्त होऊ नये. Andrew Symonds Died: 3 महिन्यात 3 क्रिकेटपटूंचे निधन, क्रिकेट विश्वाला मोठा फटका ‘उमरानने 100 mph ने गोलंदाजी केल्यास आनंद होईल’ उमरानची T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड करावी का? त्याला उत्तर देताना अख्तर म्हणाला, निवड तर व्हायला हवी. मला त्याला खेळताना बघायचं आहे. 150 (स्पीड) चा टप्पा ओलांडलेले काही लोकच उरले आहेत. उमरान सातत्याने 150 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आहे. हे पाहून आनंद झाला. मला या नवीन मुलाची गोलंदाजी पाहायची होती. केव्हापासून फिरकीपटू बघून कंटाळा आला आहे. त्याने 100 एमपीएच वेगाने गोलंदाजी केली तर याचा मला आनंद होईल. फक्त त्याला दुखापत होऊ नये, नाहीतर त्याचे करियर पणाला लागेल. रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरच्या नावावर 161.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम आहे. उमरान अद्यापतरी 160 पर्यंत पोहोचलेला नाही. टीम इंडियाला आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरगुती टी-20 मालिका खेळायची आहे. यामध्ये उमरानला संधी मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.