Home /News /sport /

Andrew Symonds Died: 3 महिन्यात 3 क्रिकेटपटूंचे निधन, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान

Andrew Symonds Died: 3 महिन्यात 3 क्रिकेटपटूंचे निधन, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान

ऑस्ट्रेलियचा माजी ऑल राऊंडर अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याचं निधन झालं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी (Cricket Australia) गेल्या 3 महिन्यातील हा तिसरा धक्का आहे.

    मुंबई, 15 मे : ऑस्ट्रेलियचा माजी ऑल राऊंडर अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याचं निधन झालं आहे. शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये झालेल्या कार अपघातामध्ये सायमंड्सचा मृत्यू झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी (Cricket Australia) गेल्या 3 महिन्यातील हा तिसरा धक्का आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी विकेट किपर रॉड मार्श (Rod Marsh), लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) यांच्यानंतर सायमंड्सच्या जाण्यानं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाऊन्सविलेजवळ सायमंड्सच्या कारला अपघात झाला. त्याची कार एलिस नदीच्या पुलावरून बाहेर आली आणि खाली पडली. सायमंड्स स्वतः कार चालवत होते. स्थानिक आपत्कालीन सेवांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाकडून 26 टेस्ट आणि 198 वन-डे सामने खेळणाऱ्या सायमंड्सनं क्रिकेट विश्वावर मोठा ठसा उमटवला. तो 1999 ते 2007 या कालावधीमध्ये क्रिकेट विश्वावर एकछत्री राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा सदस्य होता. सायमंड्सनं टेस्ट क्रिकेटमध्ये 2 शतक आणि 10 अर्धशतकांसह 1462 रन केले. तर वन-डेमध्ये 6 शतक आणि 30 अर्धशतकांच्या मदतीनं 5088 रन त्याने काढले. रॉड मार्श : ऑस्ट्रेलियाचे माजी विकेट किपर रॉड मार्श यांचे निधन 22 मार्च 202 रोजी झाले. त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यानंतर ते कोमामध्ये होते. मार्श यांनी ऑस्ट्रेलियाकडून 96 टेस्ट खेळल्या. यामध्ये त्याने 3 शतक झळकावले. त्याचबरोबर स्टम्पमागे 355 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला. ते ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख होते. तसंच ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी दोन वर्ष काम केले होते. IPL 2022 : पुन्हा एकदा DRS चा वाद, भर मैदानात KKR चे खेळाडू अंपायरला भिडले, VIDEO शेन वॉर्न : शेन वॉर्नने देखील 22 मार्च 2022 रोजी शेवटचा श्वास घेतला. तो थायलंडमध्ये सुट्टीसाठी गेला होता. तेथील व्हिलामध्ये तो अचानक बेशुद्ध पडला. नैसर्गिक कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शेन वॉर्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 'ऑल टाईम ग्रेट' क्रिकेटपटू मानला जातो. त्यानं 145 टेस्टमध्ये 708 विकेट्स घेतल्या. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात मुरलीधरननंतर सर्वात जास्त विकेट्स वॉर्नच्या नावावर आहेत. वॉर्ननं 194 वन-डे मॅचमध्ये 293 विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये 2008 साली शेन वॉर्नच्या कॅप्टनसीमध्ये राजस्थान रॉयल्सनं विजेतेपद मिळवलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Cricket news

    पुढील बातम्या