Home /News /sport /

8 महिन्यांमध्ये भारताला मिळाला 7 वा कॅप्टन, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

8 महिन्यांमध्ये भारताला मिळाला 7 वा कॅप्टन, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

एकदिवसीय संघात अनेक जणांचा पुन्हा संधी मिळाली आहे.

  मुंबई, 6 जुलै : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा (Indian Cricket Team Announcement) करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची कमान शिखर धवनच्या (Shikhar Dhawan Indian Team Captain) हातात देण्यात आली आहे. तर रविंद्र जडेजाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत वेस्ट इंडिजचा दौरा (India Tour of West Indies) करणार आहे. याठिकाणी तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. आज बुधवारी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. यात शिखर धवनला भारतीय संघाचा कर्णधार बनविण्यात आले आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. याआधी विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यावर रोहित शर्माला कर्णधार बनविण्यात आले. तर केएल राहुल, ऋषध पंत, हार्दिक पांड्या यांनीदेखील भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. तर रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्यावर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्यात आले होते. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे - शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह एकदिवसीय संघात अनेक जणांचा पुन्हा संधी मिळाली आहे. यात संजू सैमसन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. तर ईशान किशन, शुभमन गिल यांनाही या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. दरम्यान, आता फक्त एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा नंतर होणार आहे. आगामी काळात टी-20 विश्वकप स्पर्धा होणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. भारताचा वेस्टइंडीज दौरा - पहिला वनडे - 22 जुलै, 7 वाजता दुसरा वनडे - 24 जुलै, 7 वाजता तिसरा वनडे - 27 जुलै, 7 वाजता हेही वाचा - इग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर रिपोर्टरने विचारलं Bazball माहितीये का?; पाहा, राहुल द्रविड काय म्हणाले..
  पहिला टी-20 - 29 जुलै दुसरा टी-20 - 1 ऑगस्ट तिसरा टी-20 - 2 ऑगस्ट चौथा टी-20 - 6 ऑगस्ट पांचवा टी-20 - 7 ऑगस्ट
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, Shikhar dhawan, West indies

  पुढील बातम्या