एजबेस्टन, 6 जुलै : भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यातील एजबेस्टन कसोटी (Test match) सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. मात्र, यानंतर ज्या शब्दाची चर्चा आहे तो म्हणजे, बॅझबॉल (Bazball). इंग्लंडने ज्याप्रकारे क्रिकेटचा सामना खेळला, त्याचा बॅझबॉल या खेळाचे नाव दिले जात आहे. आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही या बॅझबॉलबाबत प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर त्यांचे मजेशीर उत्तर आले. (Rahul Dravid on Bazball)
काय म्हणाले राहुल द्रविड -
एजबेस्टन कसोटीत भारतीय संघाचा सात विकेट्सनी पराभव झाला. यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे मीडियाशी संवाद साधण्यासाठी आले. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही बॅझबॉलबद्दल ऐकले आहे का? हा प्रश्न ऐकून राहुल द्रविड हसले. यानंतर ते रिपोर्टरला म्हणाले की, मला माहित नाही हा काय प्रकार आहे. मात्र, मी इतकंच म्हणेन की, इंग्लंडच्या संघाने खूप चांगल्याप्रकारे खेळ केला आणि शेवटी सामना जिंकला.
हेही वाचा - IND vs ENG : 'हा कसला गेम प्लान', पाचव्या दिवसाची अशी रणनिती, बुमराह निशाण्यावर
इंग्लंड क्रिकेट संघाचे कसोटी प्रशिक्षक ब्रैंडन मैक्कुलम यांच्या आगमनानंतर Bazball चर्चेत आला आहे. मैक्कुलम यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ आक्रमक क्रिकेट खेळत आहे आणि हे गेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये दिसून आले आहे. इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कोच ब्रॅण्डन मॅक्कलमचं टोपण नाव बॅझ आहे, त्यावरूनच याला इंग्लंडच्या खेळाडूंनी बॅझबॉल नाव ठेवलं आहे. इंग्लंडने न्यूझीलंडचा सलग तीन कसोटी सामन्यात पराभव केला आणि त्यानंतर एजबेस्टन येथे भारतीय संघाचा पराभव केला. या कसोटी सामन्यातील पराभवामुळे भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकता आली नाही.
ही सीरीज 2-2 ने ड्रॉ झाली. एजबेस्टनमध्ये भारताने पहिल्या इनिंगमध्ये 416 इतका मोठा स्कोर बनवला होता. यानंतर इग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये 284 इतका स्कोर केला. मात्र, दुसऱ्या इनिंगमध्ये सर्व खेळच पलटला. भारतीय संघ 245 धावसंख्येवर ऑलआऊट झाला. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला 378 धावांचे आव्हान मिळाले होते. त्याला इंग्लंडने जो रुट आमि जॉनी बेयरस्टोच्या शतकाच्या मदतीने फक्त 77 ओव्हर्समध्ये पूर्ण केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Rahul dravid, Team indian