सुरत, 10 नोव्हेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा असा एकमेव खेळाडू आहे, ज्याचा क्रिकेट विश्वास दबदबा कायम आहे. आजही असे अनेक रेकॉर्ड आहेत, ज्यांवर फक्त आणि फक्त सचिनची मक्तेदारी आहे. मात्र आधी विराट कोहली आणि आता 15 वर्षीय युवा खेळाडू यांनी सचिनचे रेकॉर्ड मोडण्यास सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाच्या युवा खेळाडू याआधीही सचिनचा एक विक्रम मोडला होता. या खेळाडूचे नाव आहे शेफाली वर्मा. शेफालीनं भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकी कामगिरी केली. यासह वयाच्या 15व्या वर्षी अर्धशतक करणारी शेफाली सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेत शेफालीनं सचिन तेंडुलकरचा 30 वर्षांपूर्वीचा विक्रम तोडण्याची कामगिरी केली आहे. पहिल्या टी-20 सामन्यात शेफालीनं 49 चेंडूत 73 धावांची खेळी केली. हा सामना भारतानं 84 धावांनी जिंकला. वाचा- दिग्गज क्रिकेटपटूच्या 4 वर्षांच्या लेकीला लागले ‘विराट’ होण्याचे वेध! पाहा VIDEO महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेफालीचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 5वा सामना होता. शेफालीनं आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. ही कामगिरी शेफालीनं फक्त 15 वर्ष 285 दिवसांत केली. याचबरोबर शेफालीनं सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला मागे टाकले. सचिननं 16 वर्ष 214 दिवसांत ही कामगिरी केली होती.
The explosive 15-year-old Shafali Verma scored her maiden half-century in the first T20I against West Indies Women today in St Lucia. Shafali is the youngest Indian ever to score an int'l fifty👏🏾👏🏾 #TeamIndia pic.twitter.com/O2MfVdNBOv
— BCCI Women (@BCCIWomen) November 10, 2019
वाचा- नागपूर ‘फोकस’मध्ये! बांगलादेशला मोठा झटका, टीम इंडियाकडे टी-20ची सत्ता? गेल्या महिन्यात केले होते पदार्पण हरियाणाच्या या युवा खेळाडूनं गेल्या महिन्यात सुरतमध्ये दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या सामन्यात टीम इंडियात पदार्पण केले होते. शेफालीनं आपल्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात 46 धावांची खेळी केली होती. दरम्यान वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सामन्यात शेफाली (73) आणि स्मृती मंधाना (67) यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं वेस्ट इंडिजला त्यांच्याच भुमीत नमवले. वाचा- वर्ल्ड कप फायनलनंतर इंग्लड-न्यूझीलंड सामना पुन्हा टाय, या संघाची सरशी 143 धावांची विक्रमी भागीदारी 15 वर्षीय शेफालीनं स्टार क्रिकेटपटू मांधनासोबत या सामन्यात 143 धावांची रेकॉर्ड भागीदारी केली. त्यामुळं या सामन्यात भारतानं 20 ओव्हरमध्ये 185 धावा केल्या. या आव्हानाच पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाला फक्त 101 धावा करता आल्या. शेफाली आणि मांधना यांनी टी-20मध्ये सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड केला. याआधी 2013मध्ये थिरूष कामिनी आणि पूनम राऊत यांनी बांगलादेश विरोधात 130 धावांची भागीदारी केली होती. मात्र शेफाली आणि स्मृती यांनी हा रेकॉर्ड मोडत नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला.

)








