सिडनी, 10 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे चाहते जगभरात आहेत. एका कोहलीच्या नावावर क्रिकेटमधले जवळजवळ सर्व विक्रम आहेत. त्यामुळं आजच्या घडीला कोहली हा सर्वश्रेष्ठ फलंदाज झाला आहे. मात्र विराट कोहलीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. आता तर चक्क एका स्टार क्रिकेटपटूची 4 वर्षांच्या लेकीला विराट कोहली व्हायचे आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरनं चेंडू कुडतडल्याप्रकरणी बंदीनंतर कमबॅक केला. आयपीएलमध्ये फलंदाजीची आतषबाजी करत वॉर्नरनं सर्वांचे लक्ष वेधले आणि वर्ल्ड़ कपमध्ये जागा मिळवली. बंदीनंतर वॉर्नरचे एक वेगळेच रुप सर्वांना पाहायला मिळाले. मात्र याच दिग्गज वॉर्नरच्या लेकीला मात्र विराट कोहली व्हायचे आहे. वॉर्नरच्या लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वॉर्नरची लेक व्हिडीओमध्ये मी विराट कोहली आहे, असे म्हणत आहे.
This little girl has spent too much time in India. Wants to be @imVkohli pic.twitter.com/Ozc0neN1Yv
— Candice Warner (@CandiceWarner31) November 10, 2019
या व्हिडीओमध्ये वॉर्नरची लेक बॅटिंग करताना दिसत आहे. यात वॉर्नर गोलंदाजी करत आहे, तर लेक बॅटिंग करत आहे. हा व्हिडीओ वॉर्नरनं इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला.
हा व्हिडीओ सर्वात आधी वॉर्नरची पत्नी कॅंडिस हिनं शेअर केला. याच वॉर्नरच्या चेंडूवर त्याची लेक विराट कोहली स्टाईल बॅटिंग करत आहेत.
@imVkohli @davidwarner31
— CommonMan (@CommonMan150168) November 10, 2019
Aww.. she's cute, she's got power, she's got footwork.
Give her a younger brother mate ! She'll make herself and her bro an equal pro like you both!
सध्या भारत-बांगलादेश यांच्यात टी-20 मालिका होत आहे. मात्र विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळं या मालिकेत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळं रोहित शर्माकडे टी-20चे कर्णधारपद आहे.

)








