मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : याला इंग्लंडला नेलं पाहिजे...Umran Malik चे जबरा फॅन बनले शशी थरूर

IPL 2022 : याला इंग्लंडला नेलं पाहिजे...Umran Malik चे जबरा फॅन बनले शशी थरूर

रविवारी आयपीएल 2022 (IPL2022) डबल हेडर सामन्यांतील पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (srh vs pbks) संघात पार पडला. यावेळी  हैदराबादच्या पठ्ठ्यानं म्हणजेच जम्मू काश्मीरचा उमरान मलिकने (Umran Malik) शानदार कामगिरी केली. त्याची कामगिरी पाहता काँग्रेसचे वरिष्ठी नेते शशि थरुन मलिकचे (Shashi Tharoor) जबरा फॅन बनले आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 18 एप्रिल: रविवारी आयपीएल 2022 (IPL2022) डबल हेडर सामन्यांतील पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (srh vs pbks) संघात पार पडला. यावेळी हैदराबादच्या पठ्ठ्यानं म्हणजेच जम्मू काश्मीरचा उमरान मलिकने (Umran Malik) शानदार कामगिरी केली. त्याची कामगिरी पाहता काँग्रेसचे वरिष्ठी नेते शशी थरुर मलिकचे (Shashi Tharoor) जबरा फॅन बनले आहेत.

पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना 19 व्या षटकापर्यंत 151 धावा कुटल्या होत्या. त्यांनी शेवटच्या षटकात एकही धाव घेता आली नाही. विशेष म्हणजे, त्यांनी या षटकात आपले 4 फलंदाज गमावले. हैदराबादकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी उमरान मलिक आला होता. त्याने शेवटच्या षटकात एकही धाव न देता 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो आयपीएलमध्ये शेवटचे षटक निर्धाव षटक टाकणारा चौथा खेळाडू ठरला. त्याची ही कामगिरी पाहून काँग्रेस नेते भलतेच फिदा झाले आहेत.

त्यांनी ट्विट करत मलिकचे कौतुक केले. “आम्हाला या खेळाडूचा लवकरात लवकर भारतीय संघात समावेश करण्याची गरज आहे. किती अद्भुत प्रतिभा आहे. त्याच्या प्रतिभेचा वेळीच फायदा करून घेतला पाहिजे. ग्रीन टॉप पिचवर खेळल्या जाणाऱ्या टेस्ट मॅचसाठी त्याला इंग्लंडला नेलं पाहिजे. तो आणि बुमराह आपल्या गोलंदाजीने मोठ्यांना घाबरवतील.''

अशा आशयाचे ट्विट थरुन यांनी करत मलिकच्या कामगिरीवर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

मॅचमध्ये मलिकची विकेटची हॅट्रीक

अखेरचे षटक टाकण्यासाठी आलेल्या मलिकने पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ओडियन स्मिथला तंबूत धाडले. त्यानंतर मलिकने तिसरा चेंडू निर्धाव टाकला. चौथ्या चेंडूवर त्याने राहुल चाहरला त्रिफळाचीत केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने वैभव अरोरालाही त्रिफळाचीत केले. यानंतर त्याच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीप सिंग धावबाद झाला.

IPL2022: KL Rahul च्या चाहत्याने क्रॉस केली लिमेट, सुनील शेट्टीने दिले सडेतोड उत्तर

त्यामुळे तो आयपीएलमध्ये शेवटचे षटक निर्धाव षटक टाकणारा चौथा खेळाडू ठरला. अशी कामगिरी सर्वात आधी इरफान पठाणने केली होती. त्याने 2008 साली पंजाब संघाकडून खेळताना मुंबईविरुद्ध शेवटचे षटक निर्धाव टाकले होते. त्यानंतर 2009 साली मुंबईच्या लसिथ मलिंगाने डेक्कनविरुद्ध शेवटच्या षटकात एकही धाव दिली नव्हती. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जयदेव उनाडकट आहे. त्याने 2017 साली रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटच्या षटकात एकही धाव न देण्याचा कारनामा केला होता.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Shashi tharoor, SRH