नवी दिल्ली, 31 मार्च: ऑस्ट्रेलियचा महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याचे हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समजली. त्याच्या निधनावर क्रिकेट जगतात शोक व्यक्त करण्यात आहेत. दरम्यान, त्याला अखेरचा निरोप देताना सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) वर 64 कसोटी विकेटचे स्कोअरकार्ड लावण्यात आले होते. दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्नला मेलबर्न क्रिकेट मैदानावर अंतिम निरोप देण्यात आला. या कार्यक्रमात वॉर्नच्या कुटुंबासह, दिग्गज क्रिकेटपटू आणि जगभरातील वॉर्नच्या चाहत्यांनी हजेरी लावली. यादरम्यान मेलबर्न स्टेडियममध्ये शेन वॉर्न स्टँडचेही उद्घाटन करण्यात आले. एकीकडे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शेन वॉर्नला अंतिम निरोप दिला जात होता, तर दुसरीकडे सिडनी क्रिकेट ग्राउंडवर त्याच्या आठवणीत 64 कसोटी विकेटचे स्कोअरकार्ड लावण्यात आले. IPL 2022 च्या दरम्यान ‘हा’ दिग्गज खेळाडू करु शकतो निवृत्तीची घोषणा, MS Dhoni शी आहे खास नातं शेन वॉर्नने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर 64 कसोटी विकेट घेतल्या. येथे त्याच्या स्मरणार्थ प्रत्येक विकेटचे स्कोअरकार्ड बाउंड्री लाईनवर लावले गेले. प्रत्येक स्कोअरकार्डवर एक चाचणी चेंडू देखील जोडलेला होता. सिडनी क्रिकेट ग्राउंडने या स्कोअरकार्ड्सचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Shane Warne took 64 Test wickets at the @SCG. A tribute featuring the scorecards of each Test wicket hugs the boundary tonight. #LoveOurSCG pic.twitter.com/9cT0kgSLgD
— Sydney Cricket Ground (@scg) March 30, 2022
शेन वॉर्नचे 4 मार्चला निधन झाले. तो थायलंडमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. वॉर्न 52 वर्षांचा होता. त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला. त्यांच्या शवविच्छेदन अहवालात ही बाब समोर आली आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव चार्टर्ड विमानाने ऑस्ट्रेलियात आणण्यात आले. शेन वॉर्नने आपल्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट घेतल्या. या आकड्याला स्पर्श करणारा तो पहिला गोलंदाज ठरला. नंतर श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने त्याला मागे सोडले. सध्या शेन वॉर्न हा श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरननंतर सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय वॉर्नच्या नावावर 193 एकदिवसीय सामन्यात 291 बळी आहेत.