जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Shane Warne Death : रिसॉर्टमधील CCTV फुटेज आले समोर, मसाजसाठी केलं होतं बुकिंग; कॅमेरात दिसणाऱ्या त्या महिला कोण?

Shane Warne Death : रिसॉर्टमधील CCTV फुटेज आले समोर, मसाजसाठी केलं होतं बुकिंग; कॅमेरात दिसणाऱ्या त्या महिला कोण?

Shane Warne Death

Shane Warne Death

ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्नचा (Shane Warne Death) थायलंडमध्ये मृत्यू झाला, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. रम्यान, एका रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. मात्र, काही महिलादेखील कॅमेरामध्ये कैद झाल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 मार्च: ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्नचा (Shane Warne Death) थायलंडमध्ये मृत्यू झाला, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सोमवारी थायलंड पोलिसांनी शेन वॉर्नच्या पोस्टमॉर्टम (Postmortem) रिपोर्टबाबत माहिती दिली. शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक आहे, यामध्ये काहीही संशयास्पद आढळलेलं नाही, असं थायलंड पोलिसांनी सांगितलं आहे. परंतु अनेक गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान, एका रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. मात्र, काही महिलादेखील कॅमेरामध्ये कैद झाल्या आहेत. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न आणि त्याच्या मित्रांचा मसाज करण्यासाठी काही महिला आल्या होत्या. या महिला रिसॉर्टमध्येही आल्या होत्या. शेन वॉर्नला फुटमसाज देण्यासाठी एक महिला त्याच्या रुमजवळ आली आणि तिने दार ठोठावले, मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर या महिला तिथून निघून गेल्या. हॅट्रिक घेतली त्याच मैदानात शेन वॉर्नवर अंत्यसंस्कार, पंतप्रधानही उपस्थित राहणार थायलंड पोलिसांना याचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहेत. यामध्ये चार महिला रिसॉर्टमधून बाहेर जाताना स्पष्ट दिसत आहे. हा प्रकार रिसॉर्टमध्ये शेन वॉर्न याचा मृतदेह मिळण्यापूर्वी काही मिनिटांआधीचा आहे.

News18

सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न याची पाच वाजता मसाजसाठी बुकिंग होती. मसाज, फुटमसाज आणि नेल ट्रीटमेंटसाठी त्याने आम्हाला बोलावले होते. फुटमसाज देण्यासाठी रुमजवळ पोहचले तेव्हा आतून काही प्रतिसाद आला नाही. यानंतर काहीच वेळाने वॉर्न याचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले. त्या दोन महिलांनी अखेरचं पाहिलं डेली मेलच्या वृत्तानुसार, सीसीटीव्ही फुटेज दुपारी दोनच्या आसपासचे आहे. मसाज करणाऱ्या महिलांपैकी दोन महिला शेन वॉर्नच्या रुममध्येही गेल्या होत्या. या दोन महिलांनीच त्याला अखेरचे जिवंत पाहिले होते. त्यानंतर सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी शेन वॉर्न याचे निधन झाले. Shane Warne Death : शेन वॉर्नचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला 52 वर्षांचा शेन वॉर्न थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. 4 मार्चला संध्याकाळी त्याच्या निधनाचं वृत्त समोर आलं होतं. शेन वॉर्न एका व्हिलामध्ये थांबला होता, तिथल्याच रूममध्ये त्याला हृदयविकाराचा धक्का लागला. शेन वॉर्नला एम्ब्यूलन्सने रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्याचा मृत्यू झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात