जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Shane Warne Funeral: हॅट्रिक घेतली त्याच मैदानात वॉर्नवर अंत्यसंस्कार, पंतप्रधानही उपस्थित राहणार

Shane Warne Funeral: हॅट्रिक घेतली त्याच मैदानात वॉर्नवर अंत्यसंस्कार, पंतप्रधानही उपस्थित राहणार

Shane Warne Funeral: हॅट्रिक घेतली त्याच मैदानात वॉर्नवर अंत्यसंस्कार, पंतप्रधानही उपस्थित राहणार

ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne Death) याचं 4 मार्चला थायलंडमध्ये निधन झालं आहे. थायलंडमध्ये सुट्टीवर असताना व्हिलामध्येच वॉर्नला हृदयविकाराचा धक्का लागला आणि यात त्याचा मृत्यू झाला, यानंतर आता थायलंड पोलिसांनी वॉर्नचं पोस्टमॉर्टम केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 मार्च : ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne Death) याचं 4 मार्चला थायलंडमध्ये निधन झालं आहे. थायलंडमध्ये सुट्टीवर असताना व्हिलामध्येच वॉर्नला हृदयविकाराचा धक्का लागला आणि यात त्याचा मृत्यू झाला, यानंतर आता थायलंड पोलिसांनी वॉर्नचं पोस्टमॉर्टम केलं आहे. सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वॉर्नचं पार्थिव ऑस्ट्रेलियात आणण्यात येईल. शेन वॉर्नवर मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Shane Warne Funeral) केले जाणार आहेत. अंत्यसंस्कारावेळी जवळपास एक लाख लोक जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वॉर्नने याच मैदानात 1994 साली इंग्लंडविरुद्ध ऍशेसमध्ये हॅट्रिक घेतली होती. वॉर्नच्या अंत्यसंस्कारानंतर सार्वजनिक शोकसभेचं आयोजन करण्यात येणार आहे. वॉर्नचे मॅनेजर जेम्स एर्सकिने यांनी एमसीजीमध्ये वॉर्नवर अंत्यसंस्कार होतील याबाबत पुष्टी केलेली नाही, पण या महान क्रिकेटपटूची उंची पाहता कोणतं दुसरं स्टेडियम योग्य ठरणार नाही, असे संकेत त्यांनी दिले. हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार वॉर्नवर अंत्यसंस्कार दोन ते तीन आठवड्यांमध्ये होतील आणि एमसीजीमध्ये याची पूर्ण तयारी केली जाईल. वॉर्नचं कुटंब थायलंडमधून त्याचं पार्थिव ऑस्ट्रेलियात यायची वाट पाहत आहे. द एजने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि व्हिक्टोरियाचे पंतप्रधान डॅनियल ऍन्ड्रयूज यांनाही अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. वॉर्नच्या कुटंबासोबत ते तारखांबाबतही चर्चा करत आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड म्हणजेच एमसीजी शेन वॉर्नचं आवडतं मैदान होतं. एमसीजीबाहेर शेन वॉर्नचा पुतळा लावण्यात आला आहे, त्याच्या निधनानंतर तिकडे त्याच्या चाहत्यांची गर्दी होत आहे. काही जण या पुतळ्याला फुलं चढवत आहेत, तर कोणी पुतळ्याजवळ बियर, सिगरेटचं पाकिट आणि मीट पाय ठेवत आहे. वॉर्नचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दरम्यान शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत थायलंड पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टबाबत माहिती दिली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला आहे. यामध्ये शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. पोलीस याबाबत लवकरच वकिलांशी बोलणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात