मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /शाहीन होणार आफ्रिदीचा जावई! कराचीत होणार लग्न सोहळा

शाहीन होणार आफ्रिदीचा जावई! कराचीत होणार लग्न सोहळा

स्टार गोलंदाज शाहीन आज पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या मुलीशी लग्न करणार असून सध्या क्रिकेट विश्वात या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 जानेवारी : क्रिकेटर विश्वात लग्न सराईला सुरुवात झाली आहे. भारताचे क्रिकेटपटू के एल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या लग्नानंतर आता पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शाहीन शाह आफ्रिदी देखील लग्नबंधनात अडकणार आहे. शाहीन आज पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या मुलीशी लग्न करणार असून सध्या क्रिकेट विश्वात या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

आज 3 फेब्रुवारी रोजी कराची पाकिस्तान येथे सायंकाळी शाहीन आणि अंशा यांचा मुस्लिम पद्धतीने शाही विवाह सोहोळा होणार आहे. या विवाह सोहोळ्याला पाकिस्तानचे क्रिकेटर आणि मोठे राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दोन वर्षांपूर्वीच  शाहीन आणि अंशा यांचे लग्न ठरले होते. परंतु शाहीनच्या पायाला झालेली दुखापत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या व्यस्त शेड्युलमुळे हा विवाह पुढे ढकलण्यात आला होता. अंशा ही  शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी आहे. 22 वर्षाचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी लग्न करणार असल्याने क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मुलीच्या लग्नाबाबत माहिती देताना म्हटले, "माझी मुलगी अंशा आणि 22 वर्षीय वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आमच्या परंपरेनुसार लग्न करणार आहेत. हा सोहळा कराचीमध्ये होईल. लग्नानंतर शाहीन पाकिस्तान सुपर लीगच्या आगामी हंगामात सहभागी होणार आहे. तो पीएसएलमधील लाहोर कलंदर संघाचा एक भाग आहे."

First published:

Tags: Cricket, Cricket news, Kl rahul, Pakistan, Pakistan Cricket Board, Shahid Afridi