मुंबई, 25 जानेवारी : सध्या नेपाळमध्ये तिरंगी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत नेपाळचा सामना स्कॉटलंड संघाशी खेळवण्यात आला असून झालेल्या सामन्यात नेपाळने स्कॉटलंडवर विजय मिळवला. या तिरंगी मालिकेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. नेपाळ क्रिकेट संघाने तिरंगी मालिकेत स्कॉटलंडवर 2 विकेट्सने विजय मिळवला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकामेकांशी हस्तांदोलन करत असताना स्कॉटलंडच्या खेळाडूंनी नेपाळचा फलंदाज संदीप लामिछाने याच्याशी हात मिळवण्यास नकार दिला. नेपाळचा संदीप लामिछानेवर काही दिवसांपूर्वी 17 वर्षांच्या मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. माजी कर्णधाराने फिटनेसवरून रोहित शर्माची काढली लाज, म्हणाले….. आरोप केलेल्या मुलीची वैद्यकीय तपासणी झाली आणि त्यानंतर संदीप लामिछानेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्याने संदीपला अटक झाली. काही महिन्यांनंतर संदीपची जामिवावर सुटका झाली. इतकंच नाही तर नेपाळ क्रिकेट बोर्डाने त्याच्यावरिल निलंबनाची कारवाई देखील मागे घेतली आणि त्याला संघात स्थान दिले.
स्कटल्यान्डका खेलाडीले सन्दीप लामिछानेसँग मिलाएनन् हात#Galaxy4K #GalaxyNewsReport pic.twitter.com/au9ORcIFx2
— Galaxy4K (@Galaxy4KNepal) February 17, 2023
स्कॉटलंडच्या खेळाडूंनी यायचं निषेध व्यक्त करत संदीप लामिछानेला अशी वागणूक दिल्याचे बोलले जात आहे. सध्या हा विडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. यात व्हायरल व्हिडिओत दोन्ही संघांचे खेळाडू सामना संपल्यानंतर एकमेकांशी हात मिळवताना दिसत आहेत. याचवेळी रांगेत असलेला संदीप लामिछानेसुद्धा खेळाडूंशी हात मिळवण्यासाठी पुढे आला. परंतु स्कॉटलंडच्या खेळाडूंनी संदीपशी हात मिळवणं टाळलं एवढच नाही तर त्यांनी संदीपकडे बघणं देखील टाळल्याचे व्हिडिओत दिसते.