जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / माजी कर्णधाराने फिटनेसवरून रोहित शर्माची काढली लाज, म्हणाले.....

माजी कर्णधाराने फिटनेसवरून रोहित शर्माची काढली लाज, म्हणाले.....

माजी कर्णधाराने फिटनेसवरून रोहित शर्माची काढली लाज, म्हणाले.....

माजी कर्णधाराने फिटनेसवरून रोहित शर्माची काढली लाज, म्हणाले.....

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया सोबत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी सामना खेळत आहे. अशातच भारताच्या माजी कर्णधाराने रोहित शर्माला फिट राहण्याचे सल्ले दिले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 फेब्रुवारी : 1983 मध्ये भारताला प्रथमच वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार आणि भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी भारतीय पुरुष संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा फिटनेसवर टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखती दरम्यान कपिल देव यांनी रोहित शर्माला फिटनेसवरून काही सल्ले दिले असून कर्णधार कसा असावा यावरही भाष्य केले आहे. माजी कर्णधार कपिल देव हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. मुलाखतीदरम्यान त्यांनी रोहितच्या फिटनेबद्दल बोलताना म्हंटले की, “तो एक महान फलंदाज आहे, परंतु जेव्हा तुम्ही त्याच्या फिटनेसबद्दल बोलता, तेव्हा तो थोडा जास्त वजनाचा दिसतो, किमान टीव्हीवर तरी. होय, जेव्हा तुम्ही एखाद्याला टीव्हीवर पाहता आणि नंतर वास्तविक जीवनात पाहिल्यावर ते वेगळे असू शकते. पण मी जे काही पाहतो, रोहित एक महान खेळाडू आणि उत्तम कर्णधार आहे, पण त्याने तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. विराटकडे बघा, जेव्हाही तुम्ही त्याला पाहता तेव्हा म्हणाल, काय फिटनेस आहे”. Sania Mirza & Shoaib Malik Divorce : पाकिस्तानी अभिनेत्रीने शोएब मलिक सोबतच्या नात्याबाबत केला मोठा खुलासा पुढे देव म्हणाले, “संघाच्या कर्णधारासाठी इतर अनेक गोष्टींसोबतच तंदुरुस्त राहणे ही देखील महत्वाची बाब आहे. तुम्ही जर फिट नसाल तर ही तुमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट ठरते. यासाठी रोहित शर्माला खूप मेहनत घ्यावी लागेल”. कपिल देव यांनी रोहितच्या फिटनेसबाबत प्रथमच भाष्य केले नाही. या आधी देखील त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “रोहित शर्मा हा क्रिकेट कौशल्याचा विचार करता सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. परंतु त्याच्या तंदुरुस्तीबद्दल असे म्हटले जाऊ शकत नाही”. कर्णधार कसा असावा ? माजी कर्णधार कपिल देव भारताचा कर्णधार कसा असावा याबद्दल बोलताना म्हणाले, “रोहित शर्मामध्ये कोणतीही कमतरता नाही. त्याच्याकडे सर्व काही आहे, पण मला वैयक्तिकरित्या वाटते की त्याच्या फिटनेसवर मोठे प्रश्नचिन्ह आहे. तो पुरेसा फिट आहे का? कारण कर्णधार असा असावा, जो इतर खेळाडूंना तंदुरुस्त होण्यासाठी प्रेरित करेल. संघातील खेळाडूंना त्यांच्या कर्णधाराचा अभिमान वाटला पाहिजे.” Womens T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या पोरींनी सर्वांना चुकीचं ठरवलं! प्रथमच केला असा करिष्मा सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया सोबत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी सामना खेळत आहे. कर्णधार रोहित शर्माच्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना  हा 1 मार्च पासून इंदोर येथे खेळवला जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात