जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'भारतात धावा केल्या नाहीत तर....' के एल राहुलबाबत बीसीसीआयच्या माजी अध्यक्षाने केल वक्तव्य

'भारतात धावा केल्या नाहीत तर....' के एल राहुलबाबत बीसीसीआयच्या माजी अध्यक्षाने केल वक्तव्य

'तुम्ही भारतात धावा केल्या नाहीत तर....' केएल राहुलबाबत बीसीसीआयच्या माजी अध्यक्षाने केल वक्तव्य

'तुम्ही भारतात धावा केल्या नाहीत तर....' केएल राहुलबाबत बीसीसीआयच्या माजी अध्यक्षाने केल वक्तव्य

सध्या वाईट फॉर्मातून जात असलेल्या लोकेश राहुलवर चहू बाजुंनी टीका करण्यात येत आहेत. त्याला संघातून बाहेर काढण्याची मागणी देखील काहीजण करतायंत. अशातच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि क्रिकेटर सौरव गांगुली यांनी के एल राहुल बद्दल मोठं वक्तव्य केल आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 फेब्रुवारी : भारताचा क्रिकेटर के एल राहुल सध्या वाईट फॉर्मातून जात आहे. भारताकडून खेळताना त्याने मागील अनेक सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली नाही. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातही तो खास कमाल करताना दिसत नाही. यामुळेच सध्या लोकेश राहुलवर चहू बाजुंनी टीका करण्यात येत आहेत. तसेच त्याला संघातून बाहेर काढण्याची मागणी देखील काहीजण करीत आहेत. अशातच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि क्रिकेटर सौरव गांगुली यांनी के एल राहुल बद्दल मोठं वक्तव्य केल आहे. माजी क्रिकेटर सौरव गांगुली म्हणाला, “टीका टाळण्यासाठी केएल राहुलला चांगली कामगिरी करावी लागेल. भारतात धावा केल्या नाहीत तर टीकेला सामोरे जावे लागेल. भारताच्या माजी खेळाडूंनी चांगल्या कामगिरीने राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी उच्च मापदंड प्रस्थापित केले आहेत. जर त्यानुसार कामगिरी केली नाही, तर प्रत्येक खेळाडूला टीकेला सामोरे जावे लागते”.

News18लोकमत
News18लोकमत

पुढे गांगुली म्हणाला, “केएल राहुल एकटा नाही. याआधीही अनेक खेळाडूंवर टीका झाली आहे. खेळाडूंवर खूप दडपण असते आणि त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असते. संघ व्यवस्थापनाला वाटते की तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. दिवसाच्या शेवटी प्रशिक्षक आणि कर्णधार काय विचार करतात हे महत्त्वाचे असते”. भारताकडून सलामीसाठी उतरणारा राहुल अवघ्या काही धावाकरून बाद होत असल्याने त्याच्यावर बरीच टीका केली जात आहे. यावर सौरभ गांगुली म्हणाला, “भारताकडून खेळणाऱ्या टॉप ऑर्डर बॅट्समनकडून खूप अपेक्षा असतात. कारण त्याच्या आधी अनेक खेळाडूंनी उच्च मापदंड स्थापित केले आहेत. जेव्हा तुम्ही काही काळासाठी चांगली कामगिरी करण्यात अयशस्वी व्हाल तेव्हा, तेव्हा नक्कीच टीका होईल. पण मला खात्री आहे की राहुलकडे क्षमता आहे आणि जेव्हा त्याला अधिक संधी मिळतील. तेव्हा तो धावा करेल”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात