
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दादांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम पूर्ण झाले आहे. आता लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार अशी माहिती मिळत आहे.

सौरव गांगुली सोमवारी कोलकाताहून विमानाने मुंबईत पोहोचले होते. प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित लोकांशी त्यांनी भेट घेतली. बुधवारी रात्री ते कोलकात्याला परततील. दादांच्या बायोपिकवर काम सुरू झाल्याची बातमी सुमारे दीड वर्षापूर्वी न्यूज-18 ने सर्वप्रथम दिली होती.

सौरव गांगुली यांच्यावर आधारित स्क्रिप्टवरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सौरव गांगुली यांनी स्वतः या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली असून चित्रपटाच्या पटकथेबाबत लव्ह प्रॉडक्शन हाऊसशी चर्चा होणार आहे.

चित्रपटात त्यांची भूमिका कोण अभिनेता साकारणार याविषयी सर्वांनाच उत्सुकतात आहे. या चित्रपटात भूमिका करण्याबाबत अनेक अभिनेत्यांशी चर्चा सुरु आहे. सौरभ गांगुली यांनी त्यांची भूमिका साकारण्यासाठी पहिली पसंती ही रणबीर कपूर यांना दिली होती.

या चित्रपटात सौरभ गांगुली यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील चढ उतारांसह त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील बऱ्याच गोष्टी दाखवल्या जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.